भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅरिस भेटीदरम्यान त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला. एआरवाय न्यूजने नागरी विमान वाहतूक सूत्रांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे. "इंडिया १" नावाचे पंतप्रधान मोदींचे विमान शेखुपुरा, हाफिजाबाद, चकवाल आणि कोहट भागातून पाकिस्तानात घुसले आणि सुमारे ४६ मिनिटे पाकिस्तानी सीमेत राहिले.
एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या हवाई हद्दी बंद झाल्यामुळे भारतीय पंतप्रधानांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्याची परवानगी देण्यात आली. नरेंद्र मोदींच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये, मोदींच्या विमानाने पोलंड ते दिल्ली प्रवासादरम्यान पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला होता. त्यावेळी विमान रात्री ११ वाजता पाकिस्तानी सीमेत घुसले आणि ४६ मिनिटे तिथेच राहिले.