पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणाऱ्याला अटक
Webdunia Marathi February 12, 2025 09:45 PM

Prime Minister Narendra Modi News : ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा फोन आला. सध्या पंतप्रधान मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत, धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर तपास संस्थांनाही माहिती दिली आणि ताबडतोब त्याचा तपास सुरू केला. ALSO READ:
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी चेंबूर परिसरातून एका व्यक्तीला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीने पंतप्रधान मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा फोन केल्याचा आरोप आहे. तपासात आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे आढळून आले. बुधवारी मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, '११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा फोन आला. पंतप्रधान मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहे. अशा परिस्थितीत, धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी इतर तपास संस्थांनाही माहिती दिली आणि ताबडतोब त्याचा तपास सुरू केला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी आहे. असे देखील पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने हा फोन विनोद म्हणून केला होता आणि त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.

ALSO READ:

पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहे, जिथे ते एआय समिटमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. मंगळवारी, पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत एआय समिटचे सह-अध्यक्षपद भूषवले. या परिषदेत जगातील अनेक प्रमुख नेतेही सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी आज फ्रान्सहून अमेरिकेला रवाना होतील, जिथे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील.

ALSO READ:

Edited By- Dhanashri Naik
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.