Sthal Movie : 'पाहुणे येत आहेत पोरी...' सचिन पिळगावकर यांच्या 'स्थळ' चित्रपटाचे गाणं सुपरहिट
Saam TV February 12, 2025 06:45 PM

लग्नासाठी स्थळ (Sthal ) पाहायला जाण्याची लगबग, धावपळ, काळजी व्यक्त करणारे 'पाहुणे येत आहेत पोरी...' (Pahune Yet Aahe Pori Song) हे 'स्थळ' चित्रपटातलं गाणे लाँच करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.'स्थळ' हा चित्रपट महिला दिनानिमित्त ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी स्थळ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे.

अरेंज मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट '' या चित्रपटातून दाखवली जाणार आहे. "येत आहेत पोरी..." हे गाणं मीराबाई येते आणि आशिष नारखेडकर यांनी गायलं आहे. जयंत सोमलकर यांच्या शब्दांना माधव अगरवाल यांनी स्वरसाज चढवला आहे. हार्मोनियम आणि गाण्याचा नेमका ठेका यांनी गाण्यातल्या शब्दांना आणखी रंजक केलं आहे.

चित्रपटात पारंपरिकपणे गायिकांकडून गाणी गाऊन घेतली जातात. मात्र 'स्थळ' चित्रपटातले हे गाणं गाण्याची आवड असलेल्या पण व्यावसायिक नसलेल्या मीराबाई या चंद्रपूरनजीकच्या महिलेने गायलं आहे. चाहते 'स्थळ' हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.