तुम्हाला कार घ्यायची आहे का? असं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहोत. कुटुंबाची सुरक्षितता ही पहिली बाब लक्षात घेऊन आता ऑटो कंपन्यांनी कमी बजेटच्या स्वस्त वाहनांच्या बेस व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमचे बजेट 6 लाख रुपयांपर्यंत असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्राईस रेंजमधील कोणती वाहने आहेत जी तुम्हाला 6 एअरबॅगसह मिळतील. याविषयी माहिती देणार आहोत.
नुकतीच मारुती सुझुकी सेलेरियो अपडेट करण्यात आली असून आता या कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. या कारची किंमत किती आहे आणि या रेंजमध्ये कोणती कार या कारला टक्कर देते? चला तर मग जाणून घेऊया.
मारुतीच्या हॅचबॅकच्या बेस व्हेरियंटची किंमत 5,64,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7,37,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
मारुती सुझुकीची स्वस्त हॅचबॅक एक लिटर ऑईल उत्तम मायलेज देते, पेट्रोल व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर ही कार 25.24 किमी ते 26.०० किमी पर्यंत मायलेज देते. तर या गाडीचे सीएनजी व्हेरियंट एका किलोमध्ये 34.43 किमी धावू शकते.
6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज सह हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, ईबीडीसह एबीएस आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स सारखे खास सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
ह्युंदाईकडे 6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत 6 एअरबॅगसह स्वस्त हॅचबॅक देखील आहे, जी मारुती सुझुकी सेलेरियोला टक्कर देते. विशेष म्हणजे ह्युंदाई ग्रँड i10 निओसचे बेस व्हेरियंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 5 लाख 98 हजार 300 रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.
तर टॉप मॉडेलची किंमत 8 लाख 38 हजार 200 रुपये (एक्स-शोरूम) आहे. दोन्ही वाहनांच्या बेस व्हेरियंटमधील किंमतीत 34,300 रुपये (एक्स-शोरूम) तर टॉप व्हेरियंटची किंमत 1,01,200 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ह्युंदाई ग्रँड i10 एनआयओएसमध्ये 6 एअरबॅगव्यतिरिक्त हिल असिस्ट कंट्रोल, ड्रायव्हर रियर व्ह्यू मॉनिटर आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.