SL vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाने श्रीलंकेसमोर गुढगे टेकले; नव्या सहकाऱ्यांना हाताळण्यात स्मिथ अपयशी
esakal February 13, 2025 02:45 PM

SL Won 1st ODI Against AUS : श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वन-डे सामन्यात एकहाती बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचे ५ प्रमुख खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून बाहेर झाल्यानंतर युवा खेळाडूंचा भरणा असलेला ऑस्ट्रेलिया संघ च्या नेतृत्वात मैदानात उतरला. प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा डाव २१४ धावांवर गुंडाळला व सोपे आव्हान स्वीकारले. पण गाठण्यात युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज अपयशी ठरले व ऑस्ट्रेलियाने ४९ धावांनी सामना गमावला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या च्या अवघ्या ३ खेळाडूंनी सामन्यात दुहेरी धावा केल्या. तर कर्णधार चरिथ असलंकाने शतक ठोकले. त्याच्या शतकी खेळीच्या मदतीने श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला विजयसाठी २१५ धावांचे आव्हान दिले आहे. सलामीवीर पथुम निसंका (४) व अविष्का फरर्नांडो (१) धावा करून बाद झाले. कुसल मेंडिसला अवघ्या १९ धावा करता आल्या. तर जनिथ लियांगे ११ धावा करू शकला.

चरिथ असलंका श्रीलंकेचा सातव्या क्रमांकाचा फलंदाज दुनिथ वेल्लालागे ६७ धावांची भागीदारी केली. दुनिथ वेल्लालागे चांगली फलंदाजी करत होता. पण २६ व्या षटकात ५ व्या चेंडूवर त्याला झेलबाद होऊन परतावे लागले. स्टीव्ह स्मिथने स्लिपमध्ये झेल अप्रतिम घेत त्याला माघारी पाठवले. चरिथ असलंकाने सामन्यात कप्तानी खेळी केली. त्याने १४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने सामन्यात एकूण १२६ चेंडूत १२७ धावांची खेळी केली.

२१५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १६५ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकन गोलंदाजांनी घरच्या मैदानाचा फायदा घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फार काळ मैदानावर टीकू दिले नाही. ऑस्ट्रेलियाचे सालीमीवर अवघ्या ७ धावांवर माघारी परतले. कर्णधार स्मिथही १२ धावांवर माघारी परतला. मधल्या फळीतील फलंदाजांनी धावा उभारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.

विकेटकीपर अॅलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तर अॅरोन हार्डीने ३२ धावा उभारल्या. पण त्यांना मोठी खेळी करता आला नाही. श्रीलंकन गोलंदाज महेश थिक्षानाने ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी संघातील नव्या चेहऱ्यांना आज श्रीलंकेविरूद्ध खेळण्याची संधी दिली. पण या तरूण सहकाऱ्यांना हाताळण्यात अनुभवी कर्णधार स्टीव्ह स्मिथला अपयश आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.