Uddhav Thackeray : कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का सत्र सुरू आहे. संगमेश्वर - चिपळूण या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष बने 15 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. यावेळी त्यांचा मुलगा, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने आणि शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत असणार आहेत.
संगमेश्वर, चिपळूण आणि लांजामध्ये सुभाष बने यांची ताकद आहे. यावेळी बोलताना विकासकामांसाठी आम्ही शिवसेनेसोबत जात असल्याची प्रतिक्रिया सुभाष बने यांनी दिली आहे. , सुभाष बने यांच्यासारखे जुने नेते पक्ष सोडत असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापक्षात सध्या चलबिचल सुरू झाली आहे.
राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशापाठोपाठ आता ठाकरे गटाला रत्नागिरीत धक्का सत्र सुरुच आहे. राजन साळवी यांच्यापाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्व याने युवा निरीक्षकांचा राजीनामा दिलाय. राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश याने देखील दिला युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे.
राजन साळवी यांचे बंधू संजय साळवी यांनीही उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासाठी कुटुंब त्यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. राजन साळवी यांच्यासोबत त्यांचे बंधू संजय साळवी पुतण्या दुर्गेश साळवी , मुलगा अथर्व साळवी हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.