पुणे : पुणे शहर पोलीस (Pune City Police) आयुक्तालय अंतर्गत पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतत विविध बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, अधिवेशन, इ. कर्तव्यावर तैनात असल्याने पोलीस अधिकारी/अंमलदार समवेत त्यांचे कुटूंबिय देखील ताणतणावामध्ये असतात मागील २०२४ हे वर्षे लोकसभा/विधानसभा निवडणुका विविध महत्वाचे बंदोबस्त, व्हिव्हिआयपी दौरे यामध्ये व्यस्त गेल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या कुटुंबियासोबत आनंदाचे क्षण व्यतित करता यावेत व उत्साहाचे वातावरण मिळावे यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतुन तरंग-२०२५ हा मनोरंजनपर कार्यक्रम दि.१५/०२/२०२५ रोजी सांय.०५/३० ते १०/०० वा.चे पर्यत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाचे प्रायोजक पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan) हे आहेत.
तरंग-२०२५ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक), चंद्रकांत पाटील (मंत्री उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य.), माधुरी मिसाळ ( राज्यमंत्री नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ) व इतर मान्यवर उपस्थित राहणार असुन सदर कार्यक्रमांतर्गत ‘अजय अतुल लाईव्ह’ संगीत रजनी हा मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आलेला असुन बॉलिवुड व मराठी सिने सृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पुणे शहरातील सर्व शांतता कमिटी / मोहल्ला कमिटी सदस्य व इतर महत्वाचे व्यक्ती तसेच सर्व प्रिंट व इलेक्ट्रानिक मिडीयाचे संपादक व प्रतिनिधी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
The post appeared first on .