rat१३p२०.jpg-
P२५N४४९९७
रत्नागिरी : देव कॉलेज व पिल्लई इन्स्टिट्यूटमध्ये सामंजस्य कराराप्रसंगी करार दाखवताना प्राचार्य मधुरा पाटील व डॉ. केतन विरा.
‘देव कॉलेज, पिल्लई’मध्ये सामंजस्य करार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : मुंबई विद्यापीठ संलग्न असलेले देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालय व रसायनी (जि. रायगड) येथील पिल्लई एचओसी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या करारानुसार पुढील तीन वर्षासाठी सहयोगी आणि परस्पर फायदेशीर कार्यक्रमांच्या विकासास चालना व सुविधा देण्यास तसेच शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील विद्याशाखांचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना व तसेच तिन्ही शाखेतील शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. या वेळी प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील व पिल्लई इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. केतन विरा यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.