आरबीआयकडून मिळालेल्या अपडेटनंतर 'या' कंपनीच्या शेअर्सला लागले अप्पर सर्किट; एलआयसीचीही आहे मोठी गुंतवणूक
ET Marathi February 14, 2025 02:45 AM
मुंबई : शेअर बाजाराने आज व्यवहाराची चांगली सुरूवात केली. बाजाराच्या या सकारात्मक सुरूवातीमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या तेजीत दिसून येत होते. एलआयसीची गुंतवणूक असलेली वक्रांगी या कंपनीच्या शेअर्सने तेजीसह वरच्या सर्किटला स्पर्श केला. हा शेअर १५.१० रुपयांच्या पातळीवर उघडला होता. वरचे सर्किटला स्पर्श केल्यानंतर शेअरची किंमत १५.९२ रुपयांच्या पातळीवर पोहचली. शेअरच्या या तेजीमागे कंपनीबाबत मिळालेली अपडेट आहे. कंपनीबाबत अपडेटरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून व्हाइट लेबल एटीएम अधिकृत करण्यात आले आहे. या बातमीनंतर कंपनीचे शेअर्स तेजीसह वरच्या सर्किटला धडकले. वक्रांगी कंपनी काय काम करते?३१ जानेवारी २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनी ६०३५ व्हाईट लेबल एटीएम चालवते. यापैकी ७६ टक्के टियर ४ आणि टियर ६ निमशहरांमध्ये आहेत. वक्रांगी कंपनी एटीएम, बँकिंग, विमा, वित्तीय सेवा आणि ई-कॉमर्स सोल्यूशन्सच्या सेवा प्रदान करते. कंपनीची स्थापना १९९० मध्ये झाली. कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?२०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न ६७.८८ कोटी रुपये झाले असून कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर ३१.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत करपश्चात नफा १.०४ कोटी रुपये होता. तसेच, कंपनीचा EBITDA ५.४८ कोटी रुपये होता. एलआयसीची कंपनीत किती भागिदारीबीएसईच्या आकडेवारीनुसार, Vakrangee Limited कंपनीमध्ये एलआयसीची एकूण भागिदारी ४.४ टक्के आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस प्रवर्तकांकडे ४१.७० टक्के भागिदारी होती. तर इतर लोकांकडे ५१ टक्के भागिदारी होती.बीएसईच्या आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षांत कंपनीच्या शेअर्सची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. या कालावधीत, कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ७२ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. या काळात सेन्सेक्स निर्देशांकात १६१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.