मुंबई - युती सरकारने २०२२ मध्ये ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात विविध विभागांनी दिलेल्या प्रस्तावानुसार एक लाख ५० हजार युवकांना नोकऱ्या देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मृद्संधारण विभागातील अराजपत्रित अधिकारी नेमणुकीची नियुक्तिपत्रे देताना ते बोलत होते. मंत्री फडणवीस यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे मृद व जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) पदावर निवड झालेल्या राज्यभरातील ६०१ उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वितरण केले. ते म्हणाले, की २०२२ मध्ये राज्यात ७५ हजार रिक्त जागांच्या भरतीबाबत महायुती सरकारने निर्णय घेतला.