Maha kumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्याचे अजून किती शाही स्नान बाकी? जाणून घ्या तारखा एका क्लिकवर
esakal February 14, 2025 01:45 AM

Last Shahi Snan Of Maha Kumbh Mela 2025: गेल्या दीड महिन्यापासून महाकुंभ मेळा सुरु आहे. १३ जानेवारीला सुरु झालेला हा महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीला संपन्न होईल. प्रयागराज येथे संक्रांतीपासून सुरू झालेला हा मेळा महाशिवरात्रीला संपणार आहे. असे मानले जाते कि कुंभ स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते.

तसेच महाकुंभ मध्ये स्नानाच्या तिथी आणि ठिकाणे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. आता पर्यंत महाकुंभ मेळ्यात चार स्नान संपन्न झाले आहेत आता फक्त एक सण बाकी आहे. चला तर मग जाणून घेऊया शिल्लक राहिलेल्या शाही स्नानाची तारीख.

महाकुंभ शाही स्नान

आता पर्यंत प्रयागराज येथे मकर संक्रांतीपासून चार स्नान पार पडले आहेत. त्या दिवसानंतर काही विशिष्ट तिथींना इतर शाही स्नान पार पडले. पहिले स्नान ला झाल्यांनतर दुसरे स्नान मौनी अमावास्येला पार पडले. त्यांनतर वसंत पंचमीला महाकुंभ मेळ्याचे तिसरे स्नान पार पडले. आणि दोन दिवसांपूर्वी म्हणजेच माघी अमावस्येला येथील चौथे शाही स्नान पार पडले.

महाकुंभाचे शेवटचे शाही स्नान

महाकुंभ मेळ्यातील शेवटचे शाही स्नान २६ फेब्रुवारी २०२५ रोजी म्हणजेच ला होईल. हा दिवस महादेवाला, भगवान शंकराला अर्पण केला जातो. विशेषतः कशी येथील गंगाघाटावर या दिवशी करण्याला खूप महत्त्व आहे.

माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्री शाही स्नान नाहीत?

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य मकर राशीत आणि गुरु वृषभ राशीत असतात, तेव्हा विशिष्ट तिथींना महाकुंभमधील स्नान शाही स्नान मानले जाते. मात्र, माघ पौर्णिमेस सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तसेच महाशिवरात्रीच्या दिवशीही ग्रहस्थिती बदललेली असेल. त्यामुळे या दोन्ही स्नानांना शाही स्नान म्हणता येणार नाही, तरीही या स्नानांचे धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.