अक्षय गवळी, साम प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीचा अपघात झाला यात त्यांचे निधन झाले आहे. माजी आमदार दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर स्वरूपात जखमी झाले होते, त्यांना बिडकर यांचा अपघात अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी जवळ झाला होता. बिडकर त्यांच्यावर अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.