चऱ्होलीत महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात
esakal February 19, 2025 08:45 AM

चऱ्होली, ता. १८ : ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज मंदिर कलशारोहणाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त चऱ्होली ग्रामस्थ व श्री वाघेश्वर स्व: काम सेवा मंडळाच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला मंगळवार (ता.१८) पासून सुरुवात झाली. यावेळी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या सप्ताहामध्ये बुधवार (ता.२६) पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती होणार आहे. तर साडेआठ ते साडेदहा यावेळेत शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण होणार आहे. तसेच सकाळी साडेअकरा ते दुपारी चार यावेळेत पंचक्रोशीतील महिला भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी पाच ते सहा यावेळेत हरिपाठ होईल. सव्वासहा वाजता वाघेश्वर महाराज यांची दैनंदिन आरती होईल. सायंकाळी सात ते नऊ वाजता हरी कीर्तन होणार आहे. नऊ ते अकरा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री अकरानंतर हरी जागर होईल, अशी माहिती वाघेश्वर महाराज समितीच्यावतीने देण्यात आली. विलास महाराज गेजगे, शिवव्याख्याते सचिन महाराज बेंडे, महादेव महाराज राऊत, सोपान महाराज कन्हेकर, भावार्थ महाराज देखणे, पंकज महाराज गावडे यांच्याद्वारे कीर्तनसेवा होणार आहे. उमेश महाराज दशरथे यांच्याकडून जागराची सेवा होईल. तर काल्याची सेवा उद्धव महाराज मंडलिक यांची होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.