Latest Marathi News Updates : मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत
esakal February 20, 2025 02:45 PM
Mumbai Live : मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे डाऊन दिशेच्या सर्वच लोकल गाड्या पूर्णपणे बंद झाल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

Solapur Live : सोलापूरमधील महागावमध्ये मामा आणि भाच्याचे मृतदेह सापडले

महागावमधील मामा आणि भाचा मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होते. दोघांचे मृतदेह सापडले असून एकच खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Kolhapur Live: कोल्हापुरात आज शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राज्यव्यापी बैठक

कोल्हापुरात आज शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत १२ जिल्ह्यांतील शेतकरी व प्रमुख नेते सहभागी होणार असून, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने या बैठकीचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यांतील महत्त्वाचे नेते या चर्चासत्राला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महामार्गाच्या विरोधातील पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांवर आणि शेतकऱ्यांच्या हितांसाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर येथे चर्चा होईल.

Eknath Shinde LIVE : "आमची लाडकी बहीण दिल्लीत शपथ घेणार, ही आनंदाची बाब" - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आमची लाडकी बहीण दिल्लीत शपथ घेणार आहे, ही आनंदाची बाब आहे. यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, असे सांगत त्यांनी रेखा गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या.

Dy CM DK Shivakumar LIVE : कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आध्यात्मिक सद्गुरु जग्गी वासुदेव यांची भेट

कर्नाटक : उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि त्यांच्या पत्नी उषा शिवकुमार यांनी काल आध्यात्मिक सद्गुरु आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Champions Trophy Cricket Tournament LIVE : भारताची चॅम्पियन्स मोहीम आजपासून; टीम इंडियासमोर सलामीलाच बांगलादेशचे आव्हान

दुबई : चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाची मोहीम उद्यापासून (ता. २०) सुरू होत आहे. टीम इंडियासमोर सलामीलाच बांगलादेशचे आव्हान आहे. हा प्रतिस्पर्धी धोकादायक असल्यामुळे त्यांना हलक्यात न घेण्याचा निर्धार भारतीयांनी केला आहे.

US Airport Accident LIVE : अमेरिकेत विमानतळावर पुन्हा दुर्घटना, दोन विमाने एकमेकांना धडकली; दोघांचा मृत्यू

अमेरिकेत विमान दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. अॅरिझोना राज्यातील माराना प्रादेशिक विमानतळावर दोन लहान विमानांची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटू शकली नाही. दोन्ही विमाने लहान फिक्स्ड-विंग सिंगल-इंजिन विमाने होती. यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) कडून अपघाताचा तपास सुरू आहे.

Rekha Gupta LIVE : दिल्लीची धुरा रेखा गुप्तांकडे; 'रामलीला'वर आज शपथविधी सोहळा

Latest Marathi Live Updates 20 February 2025 : दिल्लीमध्ये भाजपनं आपच्या गडाला सुरुंग लावत सत्ता मिळवली, तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता समोर आलंय. रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. आज 'रामलीला'वर त्यांचा शपथविधी होणार आहे. तसेच अमेरिकेत विमान दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. अॅरिझोना राज्यातील माराना प्रादेशिक विमानतळावर दोन लहान विमानांची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाची मोहीम आजपासून सुरू होत आहे. टीम इंडियासमोर सलामीलाच बांगलादेशचे आव्हान आहे. ‘यंदाच्या वर्षात फार निवडणुका नसल्याने पक्षसंघटनेला महत्त्व द्यावे. चौकटीबाहेर विचार करत पक्षबांधणी करावी लागेल,’’ असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या प्रभारी आणि सरचिटणीसांच्या बैठकीत केले. त्याचबरोबर राज्यात काही भागांत थंडी कमी झालेली दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.