शिवसेना निदर्शने
अँकर - कर्नाटकातील चित्रदुर्ग या परिसरात काल महाराष्ट्राची एसटी अडवून एसटी चालकाला कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. या निषेधार्थ आता शिवसेना आक्रमक झालेली आहे. कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टॅन्ड परिसरात कर्नाटक राज्यातल्या एसटी बसेस अडवण्यात आलेले आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी
Eknath Shinde Live: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शाहांची भेटउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे 4 वाजता कोरेगाव पार्कच्या हॉटेल वेस्टीन येथे दाखल झाले. त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गृह विभागाच्या विभागीय बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार.
अमित शहांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. थोड्याच वेळात होणार बैठकीला सुरुवात होणार आहे.
live Updates : संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओत चोरी, आरोपींना अटक, 37 लाख रुपये जप्तसंगीतकार आणि गायक प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी मालाड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आशिष बुटीराम सायल, वय ३२ असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 37 लाख रुपये आणि एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे.
Live : पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी धामणदेव गावाच्या परिसरातील डोंगराला भीषण आगपुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी धामणदेव गावाच्या परिसरातील डोंगराला भीषण वणवा
लागलेल्या वणव्यात, डोंगरातील वनसंपत्तीच मोठं नुकसान,
परिसरातील शेतीसह शेतीसाठीच्या पाईपलाईनचंही झालं नुकसानं
Pune Live : पुण्यातील NDA परिसरात आढळल दुर्मिळ रक्तलोचन प्रजातीचं घुबड- NDA तील आर्मी ऑफिसर दीपक डब्बास यांच्या घराशेजारी आढळले ह्या रक्तलोचन दुर्मिळ जातीच्या घुबडाचे पिल्लू
- याची माहिती डब्बास यांनी प्राणीमित्रांना कळविल्यानंतर, पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या प्राणीमित्रांनी त्याठिकाणी जात जखमी घुबडाच्या पिल्लाला पकडून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून दोन दिवसांनी पुन्हा त्याच्या झाडावरील घरट्यात दिल सोडून.
- घुबडाचं पिल्लू इतर घुबडांजवळ सुखरूप घरट्यात विसावले.
Live : राज्यात उन्हाचा तडाखा कायम, पारा ३६ अंशांच्या पारराज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढल्याने तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वर आहे.
काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आजपासून उन्हाचा चटका कायम राहण्यासह, राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे.
उद्या तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे.
सोलापूर येथे ३८.१ अंश तापमान नोंदले गेले.कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे. सांताक्रूझ,सांगली, जेऊर, ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली,वर्धा येथे पारा ३६ अंशांच्या पार होता.
उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा कायम असून, काल निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने, उकाड्यातील वाढीने घाम निघत आहे.
आज उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याचा, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Pradhan Mantri Awas Yojana LIVE : वीस हजार लाभार्थ्यांना मिळणार घरकुलचा पहिला हप्ता; आज प्रमाणपत्र, अनुदान वाटपकोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ मधील लाभार्थ्यांना आज (ता. २२) मंजुरीपत्र व पहिला हप्ता वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील चाळीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. यापैकी २० हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता आणि प्रमाणपत्र वाटप विवेकानंद महाविद्यालयातील डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी दिली. जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
PM Kisan Installment : पीएम किसानचा हप्ता सोमवारी मिळणार; केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहितीनवी दिल्ली : पीएम किसान सन्मान योजनेचा निधी येत्या सोमवारी (ता. २४) शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केला जाणार आहे. बिहारमधील भागलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी वर्ग केला जाणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी सांगितले.
Railway Station LIVE : टिटिलागड यार्डजवळ मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरलेटिटिलागड, ओडिशा : काल रात्री ८:३० वाजता रायपूरकडे जात असताना रेल्वे स्थानकाजवळील टिटिलागड यार्ड येथे मालगाडीचे तीन डबे रुळावरून घसरले. डीआरएम संबलपूर यांच्यासह पूर्व किनारपट्टी रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून याबाबतचा तपास सुरू केला आहे.
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बीबीसी इंडियाला ३.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने डिजिटल माध्यमसंस्थांमधील परकी गुंतवणुकीवर २६ टक्के एवढी मर्यादा घातली असतानाही ‘बीबीसी इंडिया’ आणि त्यांच्या संचालकांनी या नियमांचे पालन केले नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
Sant Gadge Baba Jayanti LIVE : सांगलीत संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त उद्या प्लास्टिक कचरा संकलनसांगली : पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशनतर्फे गेल्या ५० महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आणि संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त साधत रविवारी (ता. २३) महापालिका क्षेत्रात प्लास्टिक संकलन मोहीम होत आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात सहा मार्चपर्यंत बंदी आदेश लागू, काय आहे कारण?कोल्हापूर : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलने सुरू आहेत. तसेच यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी उद्या, शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून सहा मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
New India Bank LIVE : न्यू इंडिया बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिमन्यू भोवनला अटकLatest Marathi Live Updates 22 February 2025 : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. तसेच न्यू इंडिया बँकेतील १२२ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिमन्यू भोवन याला शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बीबीसी इंडियाला ३.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी इयत्ता दहावीचा मराठी विषयाचा पेपर खुद्द केंद्र संचालकानेच फोडला. महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयातील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. त्याचबरोबर राज्यात अजूनही काही भागांत थंडी कमी झालेली दिसत नाहीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..