46930
वक्तृत्व, स्तोत्र पाठांतर स्पर्धेस प्रतिसाद
तुळस वेताळ प्रतिष्ठानचा उपक्रम; विजेत्यांचे मान्यवरांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २२ ः (कै.) गुरुदास तिरोडकर स्मृतिप्रित्यर्थ वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि स्तोत्र पाठांतर स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. तुळस येथील श्री शिवाजी हायस्कूल येथील जैतिराश्रित संस्थेच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात आयोजित वक्तृत्व स्पर्धा शालेय लहान व मोठा गट आणि इंग्रजी वक्तृत्व विशेष गट अशा गटांमध्ये, तर पाठांतर स्पर्धा संस्कृत श्री गणपती स्तोत्र आणि श्री मारुती स्तोत्र या विषयांवर झाली.
स्पर्धेचे उद्घाटन श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप तुळसकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते नारायण नागवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, प्रदीप परुळकर, प्रसाद भणगे, सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत, सचिन गावडे, किरण राऊळ आदी उपस्थित होते.
स्तोत्र पाठांतर स्पर्धेत जिल्ह्यातील ४२ स्पर्धक सहभागी झाले. वक्तृत्व शालेय गट (सातवीपर्यंत) ‘महाराष्ट्रातील संत परंपरा’ तर शालेय मोठ्या गटासाठी (आठवी ते दहावी) ‘मराठी भाषा अभिजात:पुढे काय?’ आणि इंग्रजी वक्तृत्व गटासाठी ‘दी ग्रेट लीडर छत्रपती संभाजी महाराज’ असे विषय होते. या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे ः संस्कृत श्री गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धा-विनायक ओगले (परबवाडा क्र.१), यशश्री दळवी (वजराट क्र. १), शुभ्रा ठुंबरे (अंगणवाडी तुळस कुंभारटेंब), उत्तेजनार्थ रुद्र शिंदे (कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी), राही मोबारकर (एम. आर. देसाई, वेंगुर्ले). श्री मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा-प्रसन्न बर्वे (शिवाजी प्रागतिक वेंगुर्ले), ज्ञानेश्वरी तांडेल (जिल्हा परिषद शाळा तुळस), सर्वज्ञ वराडकर (केंद्रशाळा बांदा क्र. १), उत्तेजनार्थ पर्णवी सर्वेकर (आंदुर्ले क्र. १), युगाली ठुंबरे (शारदा विद्यालय कुंभारटेंब). वक्तृत्व शालेय लहान गट (सातवीपर्यंत)-स्पृहा दळवी (दोडामार्ग केंद्रशाळा क्र.१), अदिती चव्हाण (एम. आर. देसाई, वेंगुर्ले), शुभ्रा अंधारी (वेंगुर्ले क्र. १), उत्तेजनार्थ सर्वज्ञ वराडकर (केंद्रशाळा बांदा क्र. १), द्वितीय देवेश नवार (परबवाडा क्र.१). प्रदीप सावंत, प्रगती चव्हाण, प्रा. वैभव खानोलकर, डॉ. जी. पी. धुरी, प्रा. सीमा परब-सावंत, संजना तुळसकर, अश्विनी अडके, सुबोध मराठे, किरण ताह्मणकर, विवेक शेवडे यांनी परीक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविले.
---
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल असा
शालेय गट (आठवी ते दहावी)-श्रावणी आरोंदेकर (कुडाळ हायस्कूल), प्राजक्ता भोकरे (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), अमृता नवार (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), उत्तेजनार्थ सोनल मराठे (श्री शिवाजी हायस्कूल, तुळस), द्वितीय सृष्टी गावडे (आसोली हायस्कूल). इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा शालेय गट (दहावीपर्यंत)-तनिष्क नवार (सिंधुदुर्ग विद्यानिकेतन), सेजल रेडकर, अमृता नवार (दोघी न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), उत्तेजनार्थ शुभंकर वराडकर (साई विद्यामंदिर), संजीव कांबळी (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा).