आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 फेब्रुवारी 2025
esakal February 23, 2025 01:45 PM
पंचांग

२३ फेब्रुवारी २०२५ साठी रविवार : माघ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ६.३७, चंद्रोदय पहाटे ३.५५, चंद्रास्त दुपारी २.०१, भारतीय सौर फाल्गुन ४ शके १९४६.

दिनविशेष
  • १९९३ : प्रसिद्ध हिंदी कवी व लेखक नरेश मेहता यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

  • १९९६ : कोकण रेल्वेच्या चिपळूण-खेड टप्प्यातील वाहतुकीचा शुभारंभ.

  • १९९७ : देशी बनावटीच्या, वाढीव क्षमतेच्या ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

  • २००० : भारतीय साहित्यातील कामगिरीबद्दल संस्कृत पंडित डॉ. रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.