मोठी बातमी! गृह आणि कार कर्ज स्वस्त, ‘या’ सरकारी बँकेनं घेतला मोठा निर्णय
Marathi February 23, 2025 07:24 PM

बँक कर्जाची बातमी: गृह आणि कार कर्ज घेणाऱ्यांसाठी (home and car loan) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कार आणि गृह कर्ज घेणं स्वस्त झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Bank of India) रेपो दरात (Repo Rate) कपात केल्यानंतर देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने आपल्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कपातीनंतर बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. RBI ने जवळपास 5 वर्षांनंतर रेपो दरात कपात केली आहे. तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत आरबीआय रेपो दरात कपात करु शकते.

बँक ऑफ महाराष्ट्रने व्याजदरात किती केली कपात

सरकारी कर्ज देणारी बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने घर आणि कार कर्जासह किरकोळ कर्जावरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर  बँक ऑफ महाराष्ट्रने हे पाऊल उचलले आहे. पाच वर्षांच्या कालावधीनंतर RBI ने 7 फेब्रुवारी रोजी रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करून 6.25 टक्क्यांवर आणला होता. या दराने बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतात. बँक ऑफ महाराष्ट्रने आज प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सांगितले की, या कपातीनंतर, गृहकर्जासाठी त्यांचा व्याजदर हा 8.10 टक्क्यांवर आला आहे, जो बँकिंग उद्योगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. पाच वर्षांच्या कालावधीनंतर RBI ने 7 फेब्रुवारी रोजी रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करून 6.25 टक्क्यांवर आणला होता. या दराने बँका मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतात. त्यानंतर देशातील सर्व बँकांनी आपल्या कर्जदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रक्रिया शुल्क केलं माफ

कार कर्जावरील व्याजदर 8.45 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्ज आणि रेपो लिंक्ड कर्ज दर (RLLR) एक चतुर्थांश टक्क्यांनी कमी झाले आहेत. बँकेने आधीच गृह आणि कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे, असे त्यात म्हटले आहे. कमी व्याजदरासह प्रक्रिया शुल्क माफ केल्याने ग्राहकांना दुप्पट नफा मिळत आहे. तज्ज्ञांवर विश्वास ठेवला तर लवकरच सर्वसामान्यांना अधिक लाभ मिळतील.

आंतरराष्ट्रीय बँकिंगची सुरुवात

दरम्यान, पुणेस्थित कर्जदात्याला GIFT सिटीमध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (IFSC) बँकिंग युनिट स्थापन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मंजुरी मिळाली आहे. ही शाखा भारतातून ऑफशोर बँकिंग ऑपरेशन्स करण्यासाठी BOM ची पहिली आंतरराष्ट्रीय शाखा म्हणून काम करेल. यामुळे आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल आणि बँक आपल्या ग्राहकांना विशेष बँकिंग सेवा देखील प्रदान करू शकेल.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.