Viral Video: मृत्यूला चकवा! तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली, विजेच्या तारांना धडकला; नंतर उठून दगडफेक, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
esakal February 23, 2025 11:45 PM

छत्तीसगडमधील दुर्ग येथील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक तरुण तीन मजली इमारतीवरून उडी मारतो. त्यानंतर हाय-टेन्शन वायरला धडकतो. हे पाहताच तिथे उपस्थित असलेले लोक ओरडू लागतात. मात्र पुढील क्षणातच तो तरूण उठून उभा राहतो. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुमारे ४-५ दिवसांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना दुर्गच्या सिटी कोतवाली भागात घडली आहे. जिथे एक तरुण हॉटेलजवळील तीन मजली इमारतीच्या छतावर चढला आणि विचित्र कृत्ये करू लागला. माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी समजावूनही तो तरुण शांत झाला नाही आणि अचानक खाली उडी मारली.

उडी मारताना तो हाय-टेन्शन वायरमध्ये अडकला. ज्यामुळे ठिणग्या बाहेर पडू लागल्या आणि तो काही क्षणांसाठी बेशुद्ध पडला. मग तो सरळ जमिनीवर पडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे पडूनही त्या तरुणाला गंभीर दुखापत झाली नाही आणि तो लगेच उठला आणि पोलिसांवर आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर विटा आणि दगड फेकू लागला. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. पोलिसांनी कसा तरी त्याला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पोलीस तपासात असे दिसून आले की, हा तरुण ओडिशाचा रहिवासी आहे आणि त्याचे नाव तेजराज यादव आहे. तो त्याच्या उपचारासाठी दुर्ग येथे आला होता. या काळात, तो त्याच्या मुलाला दुर्ग येथील रुग्णालयात सोडून इमारतीवर चढला आणि विचित्र कृत्ये करू लागला. तेजराजने तिथे उपस्थित असलेल्या लोकांवर दगडफेक केली आणि अनेकांना जखमी केले. त्याने अनेक वाहनांच्या खिडक्याही फोडल्या.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. तेव्हा त्या तरुणाला इमारतीवरून उडी मारण्यापासून का रोखले गेले नाही? पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि तरुणाची मानसिक स्थिती देखील तपासली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.