मेष :
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
वृषभ :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मिथुन :
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्क :
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
सिंह :
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या :
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
तुळ :
जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
वृश्चिक :
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
धनु :
मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मकर :
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
कुंभ :
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
मीन :
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.