चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सगळ्यात चर्चेत असलेला महासामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान संघामध्ये खेळला जाणार आहे. क्रिकेटच्या चाहत्यांना या सामन्यासाठी खूप काळ वाट बघावी लागते. कारण दोन्ही संघ आयसीसी इव्हेंट शिवाय कोणतीही मालिका एकमेकांसोबत खेळत नाहीत. आता उद्या होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल हे पाहणं उत्सुकतेच ठरेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध पहिला सामना जिंकलेला आहे. पण यजमान संघ पाकिस्तान या सामन्याला अजिबात हलक्यात घेणार नाही. कारण पाकिस्तान पहिला सामना हरल्यामुळे स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे, पाकिस्तान जिंकण्याच्या तयारीने उद्या मैदानावर उतरेल. करा नाही तर मरा या आशेने रिजवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी मधील त्यांचा पहिला सामना खूप खराब पद्धतीने हरले होते. न्युझीलँड ने त्यांना 60 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर यजमान पाकिस्तान संघाचा नेट रन रेट खूप खराब (-1.200) झाला आहे. पाकिस्तान संघाची ताकद त्यांच्या गोलंदाजीत आहे पण पहिल्या सामन्यात त्यांच्या स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी एकही विकेट घेऊ शकला नाही. पाकिस्तानची फलंदाजी सुद्धा भारतच्या तुलनेत खूप खराब दिसत आहे.
विराट कोहली रोहित शर्मा जेव्हा चांगल्या पद्धतीने खेळत नाहीत तेव्हाही भारतीय संघ विरोधी संघाला सहजपणे हरवू शकतो. शुबमन गिल, के एल राहुल चांगली खेळी खेळत आहेत. रोहित शर्मा सुद्धा फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे. आता पाकिस्तानला भारतीय संघाला हरवणे अवघड ठरणार आहे, भारतीय संघाची गोलंदाजी पहिल्याच सामन्यामध्ये कमालीची होती. मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या. फिरकीपटू सुद्धा चांगले खेळत आहेत.
रविवारी 23 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तान होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ जिंकण्याची शक्यता 85 टक्के आहे. तसेच पाकिस्तान भारतीय संघाला हरवून जिंकण्याची शक्यता 15 टक्के आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
पाकिस्तान संघ – इमाम उल हक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिजवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर/कामरान गुलाम, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ आणि अबरार अहमद.
हेही वाचा
पाकिस्तानी मैदानावर भारतीय राष्ट्रगान! PCB वर सोशल मीडियावरती तुफान टीका
‘या’ 3 कारणांमुळे पाकिस्तानविरुद्ध वरुण चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान मिळणार?
पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका ? विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत