09963
शेंडापार्क पश्चिम बांधाला
महिन्यात दुसऱ्यांदा आग
कंदलगाव, ता. २२ : शेंडा पार्क मुख्य रस्त्यावरील पश्चिम बांधाला आज सकाळी पुन्हा आग लागली. यामध्ये झाडांचे नुकसान झाले नसले तरी बांधावरील गवत पूर्णपणे पेटले आहे. महापालिका अग्निशमन दलाने त्वरित आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टाळला.
आर. के. नगर ते कोल्हापूर मुख्य रस्त्यावरील शेंडा पार्कच्या पश्चिम बांधाला सकाळी नऊच्या दरम्यान पुन्हा आग लागली. या आगीमध्ये बांधावरील मोठे गवत पूर्णपणे जळाले.या महिन्यातील हा दुसरा प्रकार असून काही दिवसापूर्वी याच बांधाला आग लागली होती. अग्निशमन दलाच्या वाहनाने त्वरित ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.