- अनिल गाभुड
विहामांडवा - पैठणला जाणाऱ्या चालत्या एसटी बसच्या दरवाज्यातुन पडल्याने एका 75 वर्षीय ईसमाचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच मत्यु झाला आहे. भिकन बाबुलाल पाटिल (75) राहणार गांधारी (शहागड) जि. जालना असे नाव असुन सदर घटनेचा पंचनामा करुन प्रेत संबधीतांच्या ताब्यात दिले आहे.
सदरील घटना अशी की, दि. 22 फेब्रुवारी 25 शनिवार रोजी दु. 02.00 नेहमीप्रमाणे पैठण आगाराची एसटी बस क्र. MH20 BL2359 दु. 02.00 वाजता चालक श्रीकृष्ण ढाकणे व वाहक अतुल जोशी हे विहामांडव्याहुन पैठणसाठी घेउन निघाले असता गावापासुन अवघ्या एक कि. मी.अंतरावर जाताच गाडीतील जेष्ठ प्रवाशी नामे भिकन पाटिल (व्यास महाराज) हे शिटवरुन उठुन दरवाज्यात गेले.
दरवाजा उघडताच चालत्या एसटी बसमधुन पडल्याने ईतर प्रवाश्यांनी आरडा ओरड करत बस चालकाला माहिती देउन गाडी थांबण्यास सांगितले. गाडी थांबताच प्रवाश्यासह चालक वाहकाने घटनेचे गांभिर्य ओळखत तात्काळ जखमी अवस्थेतील ईसमास येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मयता जवळील आधार कार्ड व बॅंक पासबुक यावरुन येथिल नागरीकांनी संबधित गावच्या ग्रामस्थांना माहिती दिली. भिकन पाटिल हे मुळचे मालेगांव येथिल असुन धार्मिक व अविवाहित आहेत. ते गेल्या पन्नास वर्षापासुन घरापासुन दुर आहेत.
त्यांचा पैठण व अंबड तालुक्यात मोठा भक्त परिवार आहे. नांदर गावचे मा. सरपंच तथा प्रा. संदिप काळे यांच्याकडे नेहमी येत असल्याने त्यांना सदर घटनेची माहिती मिळताच विहामांडवा येथे येउन भिकन पाटिल हे आमच्या घरातील एक सदस्यच आहेत त्यांना परिसरात सर्व व्यास महाराज म्हणुन ओळखत असुन, त्यांना माननारा मोठा भक्त आहे. अंत्यविधी आम्ही करु म्हणुन प्रेत संबधीतांच्या ताब्यात दिले.