46944
जिल्हा वाचक स्पर्धेत
हेमंत पाटकर प्रथम
आचरा, ता. २२ ः मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून येथील श्री रामेश्वर वाचन मंदिरतर्फे आयोजित जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत हेमंत पाटकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक योगेश मुणगेकर, तृतीय पूर्वा खाडिलकर तर उत्तेजनार्थ सुगंधा गुरव, ऋतुजा केळकर, प्रज्ञा कांबळी, नेहा करंदीकर, नेहा घाडी यांना गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून संजीव राऊत व श्रुती गोगटे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन वर्षा सांबारी यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उपाध्यक्ष अशोक कांबळी, साहित्यिक सुरेश ठाकूर, भिकाजी कदम, ग्रंथपाल विनिता कांबळी, श्रद्धा महाजनी आदी उपस्थित होते.