खेरवसेत मंगळवारपासून
महाशिवरात्र उत्सव
लांजा, ता. २२ ः तालुक्यातील खेरवसे येथील ग्रामविकास मंडळातर्फे २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत श्री स्वयंभू शंकर देवालयाचा महाशिवरात्र उत्सव व वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. २५ला सकाळी सात वाजता पूजापाठ, नऊ वाजता पालखीला रुपये लावणे, बारा वाजता पूजापाठ व आरती, ३ ते सायंकाळी ६ हळदीकुंकू समारंभ, ७ ते ९ भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतील. १०.३० वाजता गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम होणार आहे. २६ ला सकाळी पूजापाठ, ९ वाजता स्वयंभू शंकराला महाअभिषेक, १२ वाजता आरती व भजन, सायं. ७ ते ९ हरिपाठ व १० वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा आणि ११ वाजता बहुरंगी नमन होईल. २७ ला सकाळी ७ वा. पूजापाठ, ९ वाजता आरती, ९ ते १२ भजन आणि कीर्तन होईल. दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ८.३० ते १० भजन आणि १० वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे.