कर्नाटकात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिलेत. मात्र, या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
Satara : भारताच्या लष्करात कार्यरत असणारा T 55 रणगाडा साताऱ्यातसातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच साताऱ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस चौकात आज T55 CAFVD रशियन मेड असणारा 38 टन वजनाचा रणगाडा लावण्यात आला आहे. यानिमित्तानेखासदार उदयनराजे भोसले यांचे भारतीय सेनेबद्दलचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. उदयनराजे यांनी 3 तास उभे राहून कामाची पाहणी केली.
Bhandara News : गणिताच्या पेपरला कॉपी करणाऱ्यावर भरारी पथकाची कारवाईभंडाऱ्यातील एकोडी येथील परीक्षा केंद्रात कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली आहे. बारावीच्या गणित विषयाच्या पेपर दरम्यान भरारी पथकानं तपासणी केली. यावेळी विद्यार्थी कॉपी करताना आढळला. त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. साकोली तालुक्यातील एकोडी येथील स्वर्गीय निर्धनराव वाघाये पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : देशमुख हत्या प्रकरणाचे दिल्लीत पडसादसरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू तसंच मंत्री धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांचे पडसाद दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटल्याचं पाहायला मिळालं. मराठवाडा साहित्य परिषदेने याबाबत मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत वाद झाला.मात्र, अद्याप हा ठराव स्वीकारण्यात आलेला नाही.