नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुंडलीच मांडली, मागितला 18 मर्सिडीजचा हिशोब
GH News February 23, 2025 07:08 PM

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे, नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं असून, पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.  शिवसेना ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हे यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेमंक काय म्हणाले अखिल चित्रे? 

‘आजपर्यंत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ९ पदांसाठी १८ मर्सिडीज दिल्या… म्हणजे

ह्या गाड्या देऊन पदं मिळवत होत्या असं मानावं का? म्हणजे ही पदं त्यांनी स्व-कर्तृत्वावर मिळवली नव्हती ! कृपया महाराष्ट्राने दखल घ्यावी. कारण

२००२ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निवड (पहिला कार्यकाल) २००८ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (दुसरा कार्यकाल) २०१० : शिवसेना पक्षाचे प्रवक्ते २०११ पासून: शिवसेना उपनेते २०१४ : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (तिसरा कार्यकाल) २०१५: विशेष हक्क समिती (विशेष हक्क समिती) अध्यक्ष, महाराष्ट्र विधान मंडळ २०१९: महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापती म्हणून निवड २०२०: महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून पुनर्निवड (चौथा कार्यकाल) २०२०: महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून पुनर्निवड ते आजतागायत

नीलम ताई तुम्ही म्हणता १ पदासाठी शिवसेनेत २ मर्सिडीज द्यावी लागतात मग वरील ९ पदांसाठी तुम्ही दिलेल्या १८ मर्सिडीजची माहिती महाराष्ट्रासमोर मांडू शकलात तर बरं होईल. २२ फेब्रुवारी १९९८ रोजी म्हणजे बरोबर २७ वर्षांपूर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजींच्या कार्यकाळात इतकं मिळूनही अन्याय म्हणत असाल तर तुम्हाला साहित्याची पार्श्वभूमी आहे म्हणून सांगतो ‘हा शुद्ध कृतघ्नपणा आहे’ ! असं ट्विट चित्रे यांनी केलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे, त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. अखिल चित्रे यांच्यानंतर आता विनायक राऊत यांनी देखील गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.