पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात आमनेसामने आहेत. पाकिस्तानने या महामुकाबल्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हक ही सलामी जोडी मैदानात आली. तर टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने पहिली ओव्हर टाकली. मात्र शमीने या पहिल्याच ओव्हरमध्ये नको तसं केलं. एका ओव्हरमध्ये साधारणपणे 6 बॉल टाकले जातात. मात्र शमीने तब्बल 11 बॉल टाकले. त्यामुळे शमीच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.
शमीने त्याच्या आणि सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या. शमीने या 6 पैकी 5 धावा या एक्स्टाद्वारे दिल्या. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शमीने या ओव्हरमध्ये तब्बल 5 वाईड टाकले. त्यामुळे शमीला या ओव्हरमध्ये 11 बॉल टाकावे लागले. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला फुकटात 5 धावा मिळाल्या. शमीच्या नावावर यासह नकोसा विक्रम झालाय. शमी एकाच ओव्हरमध्ये 5 वाईड टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. तसेच शमी एका ओव्हरमध्ये 11 बॉल टाकणारा एकूण तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. शमीआधी झहीर खान आणि इरफान पठाण या दोघांनी एका ओव्हरमध्ये 11 बॉल टाकण्याचा कारनामा केला आहे.
दरम्यान पाकिस्तानने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 2 विके्टस गमावून 52 धावा केल्या. बाबर आझम आणि इमाम उल हक या दोघांच्या रुपात पाकिस्तानने विकेट्स गमावल्या. हार्दिक पंड्या याने बाबरला विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं. तर अक्षर पटेल याने इमाम उल हक याला कडक थ्रो करत रन आऊट केलं. इमामने फटका मारुन चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षरने नॉन स्ट्राईक एंडला कडक थ्रो करत इमामला रन आऊट केलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
शमी तिसरा भारतीय गोलंदाज
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.