Maha Shivratri vrat-Friendly Recipe: महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर साबुदाणा खिचडी नाही तर १० मिनिटांत बनवा कुरकुरीत शाबुदाणा थालीपीठ,नोट करा रेसिपी
esakal February 24, 2025 03:45 PM

Maha Shivratri vrat-Friendly Recipe: देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावे साजरा केला जातो. यंदा २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. शिव भक्तांसाठी हा दिवस खुप खास आहे. या दिवशी भगवान भोलेनाथाची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात. तसेच महादेवाला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्या. तर अनेक भक्त निर्जला उपवास करतात.

यंदा महाशिवरात्रीला तुम्ही उपवास करत असाल तर साबुदाणा खिचडी न बनवता साबुदाणा थालीपीठ तयार करू शकता. ज्यामुळे दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. चला तर मग जाणून घेऊया सुकामेवा सॅलेड बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बटाटा

साबुदाणा

शेंगदाणा कुट

बारिक मिरची पेस्ट

पाणी

तूप

साबुदाणा थालीपीठ बनवण्याची कृती

साबुदाणा थालीपीठ तयार करण्यासाठी सर्वात आधी साबुदाणा पॅनमध्ये भाजून घ्यावा.नंतर मिक्सरमध्ये बारिक करा. नंतर बटाटे कुकरमध्ये वाफवून घ्यावे. नंतर थंड झाल्यावर बटाटे सोलून घ्यावे. नंतर एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करावे. नंतर तयार मिश्रणाचा छोटा गोळा करून कापडावर थालीपीठ थापून घ्यावे. तवा गरम करून खरपूस भाजून घ्यावे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.