दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली लागली आहे. ठाकरे यांच्या पक्षात मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नव्हतं, असा गौप्यस्फोट गोऱ्हे यांनी केला आहे. त्यानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून नीलम गोऱ्हे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसेना महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर आज दुपारी 12 वाजता तातडीची बैठक आहे. पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार महिला पदाधिकाऱ्यांची बैठकीस रश्मी ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.