Dance Video : 'झिंगाट' डान्स! टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले, हास्यजत्रेच्या टीमचा जल्लोष
Saam TV February 24, 2025 06:45 PM

'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी' मध्ये भारताने विजय मिळवला आहे. हा सामना २३ फेब्रुवारीला पार पडला. भारत विरुद्ध पाकिस्तान असा हा सामना रंगला होता. त्यामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. टीम इंडियाच्या विजयाचे सेलिब्रेशन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' खूप हटके पद्धतीने केले आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasya Jatra ) घराघरात पोहचले कलाकार आपल्या विनोदाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' काही कलाकरांचे 'थेट तुमच्या घरातून' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नाटकाची टीम इंडिया-पाकिस्तान मॅचच्या दिवशी प्रयोगासाठी एकत्र बसमधून प्रवास करत होती. तेव्हा भारताच्या विजयानंतर 'महाराष्ट्राची'च्या कलाकरांनी थेट नाटकाची बसमधून इंडियाच्या विजयाचे सेलिब्रेशन केले आहे.

भारताचा विजय हा भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. -पाकिस्तान मॅच देशभरातली लाइव्ह पाहत होते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार प्रसाद खांडेकर यांनी सोशल मीडियावर सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जात कलाकार बेभान होऊन नाचताना पाहायला मिळत आहे. त्यांनी 'झिंगाट' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांनी व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे.

प्रसाद खांडेकर पोस्ट

...आणि अश्या प्रकारे इंडिया जिंकल्यावर नाटकाची बस रस्त्यात बाजूला थांबवून 'थेट तुमच्या घरातून' नाटक मंडळाने विजय साजरा केला आहे.

प्रसाद खांडेकरच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'थेट तुमच्या घरातून' नाटकात शिवाली परब, प्रसाद खांडेकर, भक्ती देसाई, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.