योगेश काशीद
संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिने उलटले, पण अद्याप एक आरोपी फरार आहे, त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलाय. या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायाने मोठा निर्णय घेतला आहे. अन्नत्याग आंदोलनात वारकरी सहभागी होणार आहेत. आज मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले.
भागचंद महाराज झांजे यांनी मसाजोग येथे येऊन देशमुख कुटुंब यांची भेट घेतली. त्यांनी धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आंदोलनाला पाठिंबा दिला. मस्साजोगमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी देखील या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत. जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सोबत राहू असे देखील वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी सांगितलं.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आणि उर्वरित मागण्यासाठी मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याच अनुषंगाने आज वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्यांच्या होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, या अगोदर भागचंद महाराज हांडे यांना भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या बद्दल बोलल्यामुळे आणि प्रतिक्रिया दिल्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांच्या समर्थकांकडून धमक्याचे फोन आले होते. त्या संदर्भात भागचंद झांजे महाराज यांनी पोलीस अधीक्षकांना महंत नामदेव शास्त्री महाराज आणि समर्थकान विरोधात दाखल केली होती.
अन्नत्याग आंदोलनाच्या अगोदर गावकऱ्यांचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांची आज दुपारी भेट घेणार आहेत. बीडच्या पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी बालाजी तांदळीची गाडी वापरली, मग आरोपींना शोधण्यासाठी बालाजी तांदळीची गाडी का वापरली? बालाजी तांदळे आरोपींना फराळ होण्यासाठी मदत करत होता का? या संदर्भात पोलीस अधीक्षकांना विचारणा करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.