March 2025 special days and festivals : अवघ्या सहा दिवसांवर मार्च महिना येऊन ठेपला आहे. मार्च महिना म्हटला की होळी, धूलिवंदन हे सण डोळ्यांसमोर येतात. जगभरातील सर्व महिलांचा, मुलींचा हक्काचा दिवस जागतिक महिला दिन देखील मार्च महिन्यातच येतो. याचबरोबर अनेक महत्त्वाचे दिवस मार्च महिन्यात साजरे केले जातात. मार्च महिन्यात कोणते महत्वाचे सण आणि दिवस येतात हे जाणून घेऊया.
1 मार्च (Self-Injury Awareness Day)दरवर्षी स्व-इजा जागरूकता दिन 1 मार्चला साजरा केला जातो.
3 मार्च (World Wildlife Day)3 मार्चला विश्व वन्यजीव दिवस साजरा केला जातो. वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
4 मार्च (National Safety Day )दरवर्षी 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो.
8 मार्च (International Women’s Day )दरवर्षी हा या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.
9 मार्च (No Smoking Day )या दिवशी धूम्रपान निषेध दिन म्हणून साजरा केला जातो.
13 मार्च होळी (Holi)होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे.
14 मार्च - धुलीवंदनहे लक्षात घ्या की यंदा 13 मार्च रोजी रात्री होलिका दहन केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी 14 मार्च रोजी धुलीवंदन साजरे केले जाणार आहे.
15 मार्च (World Consumer Rights Day)दरवर्षी १५ मार्चला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो.
16 मार्च (National Vaccination Day)राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो.
20 मार्च (International Day of Happiness)आंतरराष्ट्रीय आनंद दिवस साजरा केला जातो.
21 मार्च (World Poetry Day)जागतिक कविता दिन दरवर्षी 21 मार्चला साजरा केला जातो. जगभरातील कविता वाचन, लेखन आणि शिकण्यासाठी जागतिक कविता दिन साजरा केला जातो. आजचा दिवस कवितेचे सौंदर्य आणि सामर्थ्य यांचे कौतुक करण्याची तसेच सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय बदलांना प्रेरणा देणारी महत्त्वपूर्ण भूमिका स्वीकारण्याची संधी आहे. कवींचा सन्मान करण्यासाठी आणि काव्यवाचनाची परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक जल दिनाचे उद्दिष्ट सर्व सजीव प्रजातींच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा आहे. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यातील केवळ 2.5 टक्के पाणी वापरासाठी योग्य आहे. बाकी सर्व खारे पाणी आहे, जे सेवन करता येत नाही. त्यामुळे भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.
23 मार्च (World Meteorological Day)दरवर्षी 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. हा दिवस 1950 मध्ये जागतिक हवामान संघटना (WMO) ची स्थापना झाल्याचे चिन्हांकित करते.
27 मार्च (World Theatre Day)दरवर्षी 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वत्र उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.
29 मार्च (Good Friday)गुड फ्रायडे हा ख्रिश्चन समुदायाचा एक अतिशय खास सण आहे. हा शोकदिन म्हणूनही साजरा केला जातो. गुड फ्रायडेला ग्रेट फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा होली फ्रायडे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या दिवशी प्रभु येशूच्या स्मृतीप्रित्यर्थ ख्रिश्चन धर्माचे लोक हा सण संस्मरणीय पद्धतीने साजरा करतात. सर्वजण चर्चमध्ये जातात आणि एकत्र प्रार्थना करतात.
30 मार्च - गुढीपाडवा (Gudi Padawa)नवीन वर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीने होत असून या दिवशी गुढीपाडवा हा सणही साजरा केला जातो. गुढीपाडवा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. यंदा 30 मार्चला हा सण साजरा केला जाणार आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.