Sandwich Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा पीनट बटर अन् जेली सॅडविच, नोट करा रेसिपी
esakal February 25, 2025 04:45 PM

Sandwich Recipe: सकाळी अनेकांना ऑफिसला जायची घाई असते. यामुळे अनेक लोक नाश्ता करत नाहीत. तुम्हाला सकाळी कमी वेळेत आणि आरोग्यदायी नास्ता हवा अशेल तर पीनट बटर आणि जेली सॅडविच तयार करू शकता. हे पीनट बटर आणि जेली सॅडविच खायला चवदार असून बनवायला देखील सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया पीनट बटर आणि जेली सॅडविच बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

पीनट बटर अन् जेली सॅडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ताज्या ब्रेडचे स्लाइस (शक्यतो गव्हाचा वा मल्टीग्रेन ब्रेड घ्या.)

पीनट बटर (क्रीमी)

जॅम (कोणत्याही स्वादाचा)

पीनट बटर अन् जेली सॅडविच बनवण्याची कृती

ब्रेडच्या एका स्लाइसवर क्रीमी पीनट बटर व दुसऱ्या स्लाइसवर तुमच्या आवडीचा कोणताही जॅम पसरवा. ब्रेडची पीनट बटर लावलेली व जॅम लावलेली बाजू एकमेकांवर ठेवून सॅण्डविच बनवा आणि त्रिकोणी कापून खा.

घरच्या घरी पीनट बटर कसे करावे?

१ वाटी भाजलेले शेंगदाणे घ्या. हातांनी भरडून आणि पाखडून शेंगदाण्याची साले काढून टाका. हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घाला आणि चटणी वाटतात, तसे हे शेंगदाणे बारीक करा. हळूहळू शेंगदाण्यात असलेले तेल सुटे होईल व त्याची पेस्ट तयार होईल, शेंगदाण्याची पेस्ट झाल्यावर त्यात १ चमचा मध आणि २ चिमूट मीठ घाला व पुन्हा थोडे फिरवा. 'होममेड' पीनट बटर तयार !

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.