महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात गुंतवणूकीसाठी उरले काही दिवस, ही आहे अखेरची मुदत
ET Marathi February 26, 2025 10:45 PM
मुंबई : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेत गुंतवणूक करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी सरकारने अद्याप वाढवलेला नाही. महिला सन्मान प्रमाणपत्रात गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. ज्या महिलांनी अद्याप या योजनेत गुंतवणूक केलेली नाही त्यांच्याकडे फक्त मार्च २०२५ पर्यंतचा वेळ आहे.भारत सरकारने महिला आणि मुलींसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली होती. ही योजना ३१ मार्च २०२३ रोजी आझादी का अमृत महोत्सवांतर्गत सुरू करण्यात आली आणि दोन वर्षांच्या कालावधीसाठी ती राबविण्यात आली. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आहे. योजनेची वैशिष्ट्ये- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत वार्षिक ७.५ टक्के व्याजदर मिळतो. हा दर बँकांच्या २ वर्षांच्या एफडीपेक्षा जास्त आहे.- ही योजना सुरक्षित गुंतवणुकीसह उच्च परतावा देते.- पोस्ट ऑफिस किंवा नोंदणीकृत बँकांमध्ये खाते सहजपणे उघडता येते.- किमान गुंतवणूक : १,००० रुपये- कमाल गुंतवणूक : २,००,००० रुपये- संपूर्ण मुद्दल आणि व्याज २ वर्षांच्या कालावधीनंतर परत केले जाते.- १ वर्षानंतर खातेधारक ४० टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतात.- गंभीर आजार किंवा खातेधारकाचा मृत्यू अशा विशेष परिस्थितीत खाते अकाली बंद केले जाऊ शकते.- खातेदाराने ६ महिन्यांनंतर खाते बंद केले तर व्याजदर कमी होऊ शकतो. ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करता येईलही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. महिलांसाठी हा एक सुरक्षित आणि उच्च व्याजदराचा गुंतवणूक पर्याय आहे. तुम्ही अजून गुंतवणूक केली नसेल, तर लवकर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जा आणि खाते उघडा.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.