ajr253. jpg 47589
आजरा ः येथील आजरा महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना डॉ. स्वप्नील बुचडे. शेजारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे, डॉ. आनंद बल्लाळ.
भाषिक कौशल्यांच्या विकासाने
व्यक्तिमत्त्व उजळते : डॉ. बुचडे
आजरा महाविद्यालयात व्याख्यान
आजरा, ता. २६ : माणसाची भाषा ही त्याची ओळख असते. प्रत्येक माणसाची बोलण्याची, लिहिण्याची शैली स्वतंत्र असते. त्यामुळे भाषिक कौशल्यांच्या विकासाने माणसाचे व्यक्तिमत्त्व उजळते, असे डॉ. स्वप्नील बुचडे यांनी सांगितले.
आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग, भाषा भगिनी मंच आणि ज्ञान स्रोत मंडळ यांच्यातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ. बुचडे यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्षस्थानी होते. अभिजात मराठी भाषा या विषयावरील भितीपत्रिकेचे प्रकाशन व ग्रंथ प्रदर्शन झाले.
उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा. रमेश चव्हाण, ग्रंथपाल रवींद्र आजगेकर, डॉ. अविनाश वर्धन, डॉ. सलमा मणेर, प्रा. शेखर शिऊडकर, प्रा. सुवर्णा धामणेकर, प्रा. सुषमा नलवडे उपस्थित होते. मराठी विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी संयोजन केले. डॉ. आप्पासाहेब बुडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.