ajr261. jpg 47824
आजरा ः तहसीलदार समीर माने यांना निवेदन देतांना सचिन इंदुलकर व शेतकरी.
सोलरची सक्ती न करता
शेतीपंपाना वीज जोडणी द्या
शेतकऱ्यांचे आजरा तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २६ ः सोलरची सक्ती न करता शेतीपंपाना वीज जोडणी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, २०१९ पासून शेतकरी शेतीपंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणकडे मागणी करीत आहेत. महावितरणच्या नियमानुसार कोटेशन भरून कागदपत्रांची पूर्तता केली आहे; पण महावितरणकडून सोलरची सक्ती केली जात आहे. सोलर घेतल्यानंतर वीज जोडणी दिली जाईल असे सांगत आहेत. एकीकडे वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे वीज जोडणीअभावी शेतीला वेळेत पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. वन्यप्राण्यांकडून सोलर प्लेटचे नुकसान होत आहे. त्यामुळे सोलरची सक्ती न करता वीज जोडणी द्यावी. अन्यथा शेतकरी शंकध्वनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर रवि पाटील (मडिलगे), आशिष दोरुगडे (सोहाळे), चंद्रकांत जाधव, विलास गुरव (खानापूर), सचिन इंदुलकर, अरुण गुडूगळे (आजरा), ज्ञानू लाड (रायवाडा) भिकाजी शेटगे (पारपोली), ज्ञानदेव लाड (रायवाडा) आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.