लॅंक्सेसचे ठाण्यात आयएडीसी
मुंबई, ता. २८ : जर्मनीची विशेष रसायन क्षेत्रातील कंपनी लॅंक्सेसने ठाण्यात आधुनिक भारतीय उपायोजना विकास केंद्र (आयएडीसी) तयार केले असून चीन येथील शांघायमधील अशा केंद्रानंतर त्यांचे आशियातील हे दुसरे मोठे केंद्र आहे.
यामार्फत औद्योगिक ग्राहकांना विशेष सेवा दिली जाईल. यातून त्यांचा भारतातील व्यवसाय तीन वर्षांत दुपटीने वाढेल. टायर, रबर प्रक्रिया तसेच बांधकाम या क्षेत्रातून कंपनीला अधिक महसुलाची अपेक्षा आहे, असे लॅंक्सेस इंडियाचे उपाध्यक्ष आणि एमडी नमितेश रॉय चौधरी म्हणाले.