महाराष्ट्र सरकारने रखडलेल्या १६६० पेट्रोल पंपांच्या परवान्यांची प्रक्रिया जलद करण्यासाठी 'एक खिडकी' सुविधा सुरू केली आहे. हे पंप सुरू झाल्यावर सुमारे ३०,००० रोजगार निर्माण होतील आणि साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचा मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल पंप सुरू करण्याची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण व्हावी यादृष्टीने परवानगी देताना अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी शर्ती ठेवता येतील का याबाबत आदर्श कार्यप्रणाली महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी तयार करावी, विभागीय आयुक्तांनी याबाबत तातडीने सूचना पाठवाव्यात.
Shivsena News : दापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर फत्तेदापोली नगर पंचायतीमधील उबाठाच्या 9 नगरसवेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. उपनगराध्यक्ष आणि 8 नगरसेवकांने प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोलीत प्रवेश केला.
परळीमध्ये 109 अज्ञात मृतदेह सापडले, खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावाबीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.ते म्हणाले, हत्या प्रकरणामुळे केवळ 4 ते 5 घटना उघडकीस आल्य आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात असे 109 मृतदेह सापडलेले आहेत, ज्यांच्याबद्दल अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या मृतांचा मर्डर झाला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. मात्र अशा 109 मृतदेहांचे पंचनामे करण्यात आल्याचंही सोनवणे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांची मागणीपुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. यावर भाष्य करतानाच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अत्याचारावेळी पीडित तरुणी ओरडली का नाही असं मोठं विधान केलंं होतं. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील घटना यावर राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचे स्टेटमेंट असंवेदनशील आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदमसारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असे म्हणत त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे”, अशी मागणी केली आहे
ठाकरेंच्या नेत्याची शेतकऱ्याला जबर मारहाणजुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉडचे चटके देत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख नवनाथ सुदाम दौड आणि त्यांचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साई संस्थानला आता परकीय चलन स्वीकारता येणारशिर्डी येथील साई संस्थानला आता परकीय चलन स्वीकारता येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे परदेशी नागरिक आणि परदेशातील भारतीय नागरिक यांना देणगी देणे सोपे होणार आहे.
मातोश्रीवरील बैठकीला दोन आमदारांची दांडी; ठाकरे गोटात काय घडतंय?शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला दोन आमदारांनी दांडी मारली आहे. परभणीचे आमदार राहुल पाटील आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे अनुपस्थित आहेत.
"मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले" : दत्ता गाडेअटकेनंतर दत्ता गाडे याने चौकशीदरम्यान पोलिसांसमोर केलेल्या दाव्याने बलात्कार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी दत्ता गाडे याने पोलीस कोठडीत टाहो फोडला. माझं चुकलं, मी पापी आहे, असं म्हणत दत्ता गाडे याने रडत पोलीसांची उत्तर दिली. यावेळी त्याने "मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले",असेही दता गाडेने सांगितले असल्याची माहिती आहे.
Datta Khade Arrest update : दत्ता खाडेची व्हीसीद्वारे सुनावणी?स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता खाडेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याला शिवाजीनगर येथील कोर्टात हजर केले जाणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. पोलिसांनी कोर्टात अर्ज सादर करून त्याच्या कोठडीबाबत व्हीसीद्वारे सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. त्यावर कोर्टाकडून थोड्याच वेळात निर्णय घेतला जाईल.
Swargate Rape Case : संवेदनशीलपणे बोलले पाहिजेपरिवहन राज्य मंत्री योगेश कदम यांच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाबाबत केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले आहेत. योगेश कदम यांनी संवेदनशीलपणे बोलावं. ते नवीन मंत्री आहेत, असे फडणवीस म्हणाले. तसेच स्वारगेट प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश होईल, असेही ते म्हणाले.
Datta Gade latest update : फाशीसाठी काँग्रेसचे आंदोलनस्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला फाशी द्यावी, या मागणीसाठी पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. लष्कर पोलिस ठाण्याबाहेर काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे.
Gajanan Marne News : नागपुरातील गुंड राजा गौस गजा मारणेसोबतकुख्यात गुंड गजा मारणेसोबत नागपुरातील गुंड राजा गौस व इतरांनी रील्स बनवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे.
Pune CP Amitesh Kumar live: गावकरी अन् पोलिस यांची संयुक्त कारवाईस्वारगेट एसटी बस स्थानक बलात्कार प्रकरणतील आरोपी दत्तात्रेय गाडे याला मध्यरात्री गुणाट (ता. शिरुर) अटक करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी दत्ता गाडे याला पकडून देण्यासाठी मदत केली. गावकऱ्यांनी केलेल्या या मदतीमुळे दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले, यामुळे गुणाट गावकरांचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आभार मानले. गाडेला पकडून देणाऱ्या व्यक्तींचा पोलिसाकडून सत्कार करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. ज्या व्यक्ती शेवटी माहिती दिली त्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
Kolhapur News: राजाराम कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आगकोल्हापूर येथील राजाराम सहकारी कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. कारखान्यातील बॉयलरला ही आग लागली असल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी दिली. घटनास्थळी अग्निशामन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले आहे. राजकीय दृष्ट्या राजाराम कारखान्याला कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्व आहे.
Haryana Budget 2025 : हरियाणा सरकार 13 मार्च रोजी बजेट मांडणारहरियाणा विधानसभेचे बजेट 13 मार्च रोजी मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे अर्थमंत्री म्हणून हे बजेट मांडणार आहेत. हरियानाचे बजेट सत्र 7 मार्च ते 25 मार्च दरम्यान असणार आहे.
Mahayuti meeting live: मुंबई आज महायुतीच्या बैठका सुरुमहाविकास आघाडीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत बैठक आहे. शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदार-खासदारांना वाय.बी.चव्हाण सेंटर येथे बैठकीसाठी बोलवले आहे. पक्षसंघटनेबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार आणि खासदारांना मातोश्रीवर बैठकीला बोलवलं आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या नावाबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
Maharashtra CM Office threatening message : वरळी पोलिसांत गुन्हा दाखलमंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करणार असा पाकिस्तानी नंबरवरून वाहतूक पोलिसांना व्हाट्सअपवर धमकीचा मेसेज आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट सतर्क झाली आहे. मालिक शहाबाज हुमायून राजा देव असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे.
Swargate Rape case : दत्ता गाडेला आज कोर्टात हजर करणारस्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक केल्यानंतर त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
Dattatray Gade arrest : पाणी पिण्यासाठी गेला आणि गाडे पोलिसांच्या जाळ्यात अडकलास्वारगेट येथे बलात्काराचे कृत्य केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे गुणाट (ता.शिरुर) येथील त्याच्या गावातील शेतात लपला. शेताशेजारी असलेल्या कॅनॉलमध्ये तो लपून बसला होता. त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. मात्र, पोलिसांनी मोबाईल स्ट्रेस करत त्याचं शेवटचे लोकेशन शोधलं आणि आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली.
यावेळी काही लोकांनी तो उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, गुरूवारी दिवसभर तो पोलिसांना सापडला नाही. मात्र, गुरुवारी रात्री पावने बाराच्या सुमारास तहान लागल्याने तो एका घरात पाणी पिण्यासाठी गेला. ज्या घरात तो पाणी पिण्यासाठी गेला होता त्या महिलेने फोन करून पोलिसांना आरोपीबाबतची माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
Swargate Rape Case news : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटकपुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अखेर मध्यरात्री अटक केली आहे. गुनाट (ता.शिरुर) येथील त्याच्या गावी असलेल्या कॅनॉलमध्ये लपून बसलेल्या नराधम आरोपीला गावकऱ्यांच्या मदतीने पुणे पोलिसांनी अटक केली. आज पुणे न्यायालयात आरोपीला सकाळी अकरा वाजता हजर केलं जाणार आहे.