इन्सुली माध्यमिक विद्यालयात सायकल स्टॅन्डचे उद्घाटन
esakal March 01, 2025 01:45 AM

swt2816.jpg
48304
इन्सुली ः येथे नूतन माध्यमिक विद्यालय येथे सायकल स्टॅन्डचे उद्घाटन करताना शिवाजीराव पालव. शेजारी अशोक सावंत व अन्य.

इन्सुली माध्यमिक विद्यालयात
सायकल स्टॅन्डचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः इन्सुली येथील विद्या विकास मंडळ संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सायकली खराब होऊ नयेत, यासाठी संत सोहिरोबानाथ सेवा समिती डोबाशेळच्या वतीने विद्यालयाच्या आवारात सायकल स्टॅन्ड उभारले आहे. नुकतेच मान्यवरांच्या हस्ते या सायकल स्टॅन्डचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सेवा समितीचे जीवन विद्या मिशनचे शिवाजी पालव, अशोक सावंत, संजय तावडे, हरिश्चंद्र पवार, मयूर चराटकर, रामचंद्र कुडाळकर, राजेश मोंडकर, प्रा. रूपेश पाटील, अमोल टेंबकर, मंगल कामत, मोहन जाधव, राजेश नाईक, शैलेश मयेकर, संजय पिळणकर, नरेंद्र देशपांडे, प्रसन्न गोंदावळे, प्रवीण परब, विश्वनाथ नाईक, दिव्या वायंगणकर, विद्या विकास संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत, गुरुनाथ पेडणेकर, अजय कोठावळे, सचिन दळवी, विकास केरकर, नंदू पालव, कमलाकर ठाकूर, सुरेश गवस, विनोद गावकर, बंड्या हळदणकर, सचिन सावंत, मुख्याध्यापिका सुविधा केरकर, उपमुख्याध्यापक संजय शेवाळे, दिगंबर मोर्ये, सचिन पालकर, विनोद चव्हाण, चंद्रलेखा परब उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.