हेगशेट्ये महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
esakal February 28, 2025 09:45 PM

rat२८p१३.jpg ः
२५N४८२१५
रत्नागिरी ः हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित प्रा. सचिन टेकाळे, प्रा. रूपाली तावडे, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, प्रा. सुकुमार शिंदे आणि प्रा. मेघना कोल्हटकर आदी.
---
इंग्रजी शब्दांचा कमीत कमी वापर करा
डॉ. आशा जगदाळे ः हेगशेट्ये महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः इंग्रजी शब्दांचा कमीत कमी वापर करा. मराठीचा शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले.
येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, मराठी विभागाचे प्रा. सचिन टेकाळे, प्रा. मेघना कोल्हटकर, प्रा. रूपाली तावडे यांनी कवी कुसुमाग्रज यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी टकाळे म्हणाले, आज प्रमाण भाषा बोलताना त्यात अनेक इंग्रजी, पारशी शब्दांचा शिरकाव आढळतो; मात्र ग्रामीण भाषेत आजही वर्षानुवर्षे चालत आलेले बोलीभाषेतील शब्दच वापरले जातात म्हणून मराठी भाषा जागृत ठेवण्याचे काम ग्रामीण भागाने खऱ्या अर्थाने केले आहे. अकरावी वाणिज्य शाखेच्या मुलींनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर केले. मुलांनी ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’ आणि विठ्ठलाचा अभंग आणि शेतकरी गीत सादर केले. मुलींनी ‘हीच आमची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे’ हे गीत सादर केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.