बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांची गुणतालिकेत आघाडीवर राहण्यासाठी धडपड असणार आहे. मुंबई इंडियन्सने चार सामन्यांपैकी तीन विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने पाच सामन्यांपैकी तीन विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सचा अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल. दिल्लीचा विजय नंबर वनची शर्यत जिवंत ठेवेल की मुंबई आपली आघाडी कायम ठेवेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंग हीने सांगितलं की, आज आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. या ठिकाणी ते कामाचे आहे असे दिसते. आज चांगले खेळायचे आहे. आम्हाला माहित आहे की स्पर्धा जिंकण्यासाठी आम्हाला आमचे सर्वोत्तम खेळावे लागेल. आमच्याकडे खूप खोली आहे आणि आम्ही एक दोन खेळाडूंवर अवलंबून नाही, वेगवेगळ्या खेळाडूंनी प्रगती केली आहे आणि मला वाटते की आम्ही ते केले आहे. आमच्याकडे दोन चांगले नवीन चेंडू गोलंदाज आहेत. त्याच टीमसह खेळणार आहोत.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘फलंदाजीसाठी ही चांगली खेळपट्टी आहे. मागील सामन्यात आम्ही या खेळपट्टीवर 180+ धावा केल्याचे पाहिले होते. आम्हाला प्रथम फलंदाजी करायला हरकत नाही. आम्हाला आमच्या क्रिकेटचा आनंद घ्यावा लागेल. आमचे काही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि आम्हाला त्यांनी खेळ सुरू ठेवावा असे वाटते. आम्ही त्याच प्लेइंग 11 संघासह खेळत आहोत.’ दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पाच वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबईने 3-2 अशी आघाडी घेतली आहे. वडोदरा येथे दिल्लीने दोन विकेटने रोमांचक विजय मिळवला होता. या सामन्यात शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग केला होता.
खेळपट्टीबाबत सांगायचं तर, खेळपट्टी क्रमांक 7 वर हा सामना होत आहे. या खेळपट्टीवर सुपर ओव्हरचा सामना झाला होता. त्या सामन्यात 360+ धावा झाल्या होत्या पण ही खेळपट्टी त्यापेक्षा वेगळी आहे. आता खेळपट्टीवरचं गवत कापले आहे आणि ती कोरडी आहे याचा अर्थ पहिल्या डावात फिरकी गोलंदाजांना काही मदत मिळू शकते. वेगवान गोलंदाजांना नेहमीच मदत मिळाली आहे. खेळपट्टी सामान्यतः संथ असेल. तुम्हाला 200 किंवा180 धावा होणं कठीण आहे. पण प्रथम फलंदाजी करताना 150 धावा हे एक चांगले लक्ष्य आहे.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, मिन्नू मणी, तितास साधू.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, जिंतीमणी कलिता.