आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर बी ग्रुपमधून अजून सेमी फायनलसाठी चुरस पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानने इंग्लंड 26 फेब्रुवारीला 8 धावांनी पराभूत केलं. तर आता इंग्लंड या मोहिमेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 मार्च रोजी खेळणार आहे. तर टीम इंडिया 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध साखळी फेरीतील अंतिम सामना खेळणार आहे. याआधी क्रिकेट विश्वातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. स्पर्धेदरम्यान कर्णधाराने नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे.
जोस बटलर याने इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजनीमा दिला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केलं. इंग्लंडचं पराभवासह या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपलं. त्यानंतर जोस बटलर याने हा निर्णय घेतला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंड टीम: फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (डब्ल्यू), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद, टॉम बँटन, गस ऍटकिन्सन, रेहान अहमद
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दक्षिण आफ्रिका टीम : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, तबरेझ शम्सी आणि कॉर्बिन बॉश.