आतापर्यंत जगात एकच ऑटो कंपनी अशी आहे जिच्याकडे सीएनजीवर चालणारी बाईक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. दुहेरी इंधनावर चालणारी बजाज कंपनीची फ्रीडम 125 प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यास मदत करते, तसेच आपला इंधन खर्च 50 टक्क्यांनी कमी करते.
ही सीएनजी बाईक तीन व्हेरियंटमध्ये, ड्रम व्हेरियंटची किंमत 90,272 रुपये (एक्स-शोरूम), ड्रम एलईडी व्हेरिएंटची किंमत 95,277 रुपये (एक्स-शोरूम) आणि डिस्क एलईडी व्हेरिएंटची किंमत 1,10,272 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या बाईकचे तीन व्हेरियंट असले तरी तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर फक्त डिस्क एलईडीच्या व्हेरियंटमध्येच मिळणार आहे.
बजाज ऑटोच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकमध्ये 2 लीटर पेट्रोल टँक आणि 2 किलो सीएनजी टँक आहे. फुल टँक पेट्रोलवर ही बाईक 130 किमीपर्यंत मायलेज देते आणि ही बाईक 2 किलो सीएनजीमध्ये 200 किमीपर्यंत धावू शकते, म्हणजेच एक किलो सीएनजीवर ही बाईक 100 किमीपर्यंत मायलेज देते.
सध्या दिल्लीत 1 किलो सीएनजीची किंमत 75.09 रुपये आहे. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने दिल्लीत ही बाईक खरेदी केली तर त्या व्यक्तीला केवळ 75.09 रुपयांमध्ये 100 किमी मायलेज मिळेल.
4 स्ट्रोक एअर कूल्ड इंजिनसह येणाऱ्या या बाईकचा टॉप स्पीड किती आहे, तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर बजाज ऑटोनुसार या बाईकसोबत तुम्हाला पेट्रोलवर 93.4 किमी प्रति तास आणि सीएनजीवर 90.5 किमी प्रति तास टॉप स्पीड मिळेल.
बजाज ऑटोच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही ही सीएनजी बाईक खरेदी केली तर तुम्हाला दर 5000 किलोमीटरवर बाईकची सर्व्हिसिंग करावी लागेल. सुरक्षिततेबाबत बोलायचे झाले तर अपघात झाला आणि सिलिंडरचा स्फोट झाला, अशी भीती सर्वांनाच वाटत आहे, या भीतीवर मात करण्यासाठी कंपनीने ही बाईक लाँच करण्यापूर्वी या बाईकची क्रॅश टेस्टही केली होती, ज्यात या बाईकने ताकद दाखवली होती.
बजाज ऑटोची ही बाईक सध्या पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या बाईकला टक्कर देते कारण अजून दुसरी कोणतीही सीएनजी बाईक बाजारात उपलब्ध नाही. लवकरच टीव्हीएस कंपनीची पहिली सीएनजी स्कूटर ग्राहकांसाठी लाँच केली जाऊ शकते, असे झाल्यास टीव्हीएस सीएनजी स्कूटर बजाज फ्रीडम 125 ला टक्कर देऊ शकते.