मांसाहारीच नाहीतर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही प्रथिनांचा भरघोस साठा, आहारात करा समावेश
GH News February 28, 2025 11:11 PM

प्रथिने हे आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. तसेच आपल्या शरीरात प्रथिने योग्य प्रमाणात असल्यास हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर तुमची त्वचा, केस आणि रोगप्रतिकार शक्ती निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात. सामान्यत: लोकं मास, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांना प्रथिनांचे सर्वात मोठे स्त्रोत मानतात. मात्र तुम्हाला माहित आहे का की शाकाहारी पदार्थ देखील प्रथिनांसाठी एक उत्तम पर्याय असू शकतात.

असे कोणते शाकाहारी पदार्थ आहेत जे प्रथिनेयुक्त आहेत आणि तुम्ही तुमच्या आहारात कसे समाविष्ट करू शकतात. जर तुम्ही फक्त शाकाहारी अन्न खात असाल आणि तुमचे प्रथिनांची कमतरता भरून काढायची असल्यास ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. चला तर मग जाणून घेऊयात…

प्रथिने का महत्वाची आहेत?

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींच्या निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक असतात. हे स्नायूंची ताकद, हाडांचे आरोग्य, हार्मोनल संतुलन आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उभ्दवू शकतात. त्याचबरोबर वयोमानानूसार योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. लोकं प्रथिनांसाठी मांसाहारी पदार्थ खाण्याला पहिले प्राधान्य देतात. पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रथिनांसाठी हे शाकाहारी पदार्थांचा समावेश करून शकतात.

प्रथिनांसाठी या शाकाहारी पदार्थांचा करा समावेश

डाळी

मुग डाळ, मसूर डाळ, चना डाळ आणि राजमा हे प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत. तूम्ही जर रोज या डाळींमधील एका तरी डाळींचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने मिळतात.

सोयाबिन आणि सोया पनीर (टोफू)

सोयाबीन हे शाकाहारी प्रथिनांचे पॉवरहाऊस मानले जाते. सोया पनीर म्हणजेच टोफू हे भाज्या किंवा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून खाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील प्रथिनांच्या कमतरता भरून काढण्यासाठी सोयाबीन हा एक चांगला शाकाहारी पर्याय आहे.

चीज आणि दही

दुग्धजन्य पदार्थांमध्येही भरपूर प्रथिने असतात. १०० ग्रॅम चीजमध्ये सुमारे १८ ग्रॅम प्रथिने आढळतात, त्यामूळे तुम्ही सूद्धा आहारामध्ये चीज आणि दही या पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करून तुमच्या शरीरातील प्रथिनांची कमतरता दुर करू शकता.

काजू आणि सीड्स

काजू आणि सीड्स देखील प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहेत. बदाम, अक्रोड, चिया बियाणे, जवस आणि भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. या सर्वा सीड्सचा तुमच्या आहारात समावेश करून स्नॅक म्हणून खाऊ शकता किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता.

क्विनोआ आणि ओट्स

क्विनोआ आणि ओट्स हे दोन्ही सुपरफूड आहेत. तुम्ही जर या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने तुमच्या शरीराला प्रथिने तसेच फायबरचे पोषक घटक मिळतील. तुम्ही नाश्त्यात ओट्स किंवा सॅलडमध्ये क्विनोआ समाविष्ट करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.