शिवाजीनगर परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त
आरोपीला घेऊन पोलीस रवाना
थोड्याच वेळात गाडेला कोर्टात हजर करणार
रत्नागिरी - दापोलीत शिवसेना उबाठाला मोठा धक्कादापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर फत्ते
उबाठाच्या 9 नगरसवेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
उपनगराध्यक्ष आणि 8 नगरसेवकांचा प्रवेश
शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत दापोलीत केला प्रवेश
धक्कादायक; नवी मुंबई येथे 14 वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा सहली दरम्यान मृत्यूमनसे तर्फे मनपा आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन.
शिक्षण उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी.
निलंबन केल्याशिवाय आयुक्तांच्या दालना बाहेरून उठणार नाही मनसेचा इशारा.
मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन.
Maharashtra Politics: संजय राऊतांच्या पोस्टरला जोडे मारत युवा सेनेचे आंदोलनखासदार संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरात शिवसेना शिंदे गट आक्रमक होत युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आल आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत हे आंदोलन केल आहे.
खासदार संजय राऊत यांच्या पोस्टरला युवा सैनिकांनी जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी सभापती नीलम गोरे यांच्या विरोधात व्यक्तव्य केल होत.
त्या विरोधात आक्रमक होत युवा सेना पदाधिकाऱ्यांनी जोडे मार आंदोलन केलंय.
भविष्यात संजय राऊत यांना सोलापुरात फिरू देणार नाही.
संजय राऊत यांना शिवसेना स्टाईल ने प्रती उत्तर देवू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
Jalna: जालन्यात सलग दुसऱ्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षकांनी घेतली वाळूमाफीयांची परेडजालन्यात सलग दुसऱ्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळूमाफीयांची परेड घेतली.
जालना जिल्ह्यात मागील सहा महिन्यात 236 वाळूमाफियांकडून पोलीस प्रशासनाने बंदपत्र लिहून घेतले आहे.
या बंदपत्राचे उल्लंघन झाल्यास तडीपारीची कारवाई करणार असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षकांचा वाळूमाफियांना दिला आहे.
दरम्यान महसूल प्रशासनासह आता पोलीस प्रशासन देखील वाळूमाफियांविरोधात कठोर भूमिका घेताना पाहायला मिळत आहे.
पुणे अत्याचार प्रकरणाचा आरोपी दत्तात्रय रामदास गाडेवर नगर शहरात देखील होता गुन्हा दाखलशहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात fir नंबर 1559/19 प्रमाणे 2019 ला 392 नुसार कारण्यात आला होता चोरीचा गुन्हा दाखल...
10 ग्रम सोने आणि रोख रक्कम चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी गाडे हाच आरोपी असल्याच निष्पन्न करून त्याला अटक करून मुद्देमाल केला होता जप्त...
कोतवाली पोलिसांनी गाडे बद्दल असलेली सर्व माहिती दिली पुणे पोलिसांना...
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड कोर्टात चालवावा एसआयटीकडून कोर्टाला विनंतीसंतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालयात चालवला जाणार आहे.
खटला बीड कोर्टात चालवा एस आय टी ची कोर्टाला विनंती
बीड कोर्टात खटला चालवण्यासाठी हायकोर्टाची परवानगी घ्या सुरक्षित कारणासाठी खटला बीड कोर्टात चालवावा एसटीची विनंती
संतोष देशमुख हत्या प्रकरण यापुढे केज कोर्टातच चालवावे लागणार
एसआयटीने हे प्रकरण बीडमध्ये चालवण्याची परवानगी मागितली होती.
मात्र सुरक्षेसाठी केवळ हे प्रकरण बीडमध्ये चालवण्यात आलं जर बीडच्या विशेष कोर्टात चालवायचा असेल तर तशी हायकोर्टाकडून परवानगी घेण्यासाठी बीड जिल्हा न्यायालयाने एस आय टी ला कळवले आहे
कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, विविध संघटनांची मागणी प्रतिमेला जोडे मारो आंदोलनइतिहासातील सन्मानजनक आणि सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूर येथील शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी अहिल्यानगर येथील अखंड मराठा समाज, जिजाऊ ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
नागपुर येथील प्रशांत कोरटकर या विक्षिप्त इसमाने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात राजमाता जिजाऊ, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अतिशय हिन दर्जाचे अवमानकारक तथ्यहीन वक्तव्य केलेले आहे.
त्यामुळे शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ कठोर शासन करावे आणि त्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात चालवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस शिंदे गट शिवसेनेच्या वतीने जोडे मारून करण्यात आला निषेधशिवसेनेच्या नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमा गोऱ्हे यांच्याबद्दल ठाकरे गट शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद धुळ्यात उमटताना दिसून आले आहेत,
शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्याचबरोबर संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला आहे,
यावेळी संजय राऊत यांनी राजकारण सोडून मानसोपचार तज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची गरज असल्याचं म्हणत,
आगामी काळात महिलांविषयी अर्वाच्च भाषेत बोलल्यास संजय राऊत यांना शिवसेना स्टाईल ने इंगा दाखविल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही असा इशारा यावेळी निषेधकर्त्या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 13 पालख्यांचा भेट सोहळा संपन्नदक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये तेरा पालख्यांचा भेट सोहळा मोठ्या भक्तीमुळे वातावरणात पार पडला.
ढोल,हलगीचा कडकडाट,भंडाऱ्याची मुक्त उधळण,फटाक्यांची आतषबाजीत श्री प्रभुलिंग देवाची यात्रा पार पडली.
गुरुवारपासून वडापूरचे ग्रामदैवत प्रभुलिन देवाच्या यात्रेस प्रारंभ झालाय.
Pune News: संस्थाचालक आणि मुख्यध्यापिकेकडून ऑनलाइन मार्क देण्यास नकार, पुण्यातील शाळेतील धक्कादायक प्रकारपुणे -
पुण्यातील स्व.झुंबरबाई मुनोत माध्यमिक विद्यालय कात्रज या शाळेतील धक्कादायक प्रकार
संस्थाचालक आणि मुख्यध्यापिकेकडून ऑनलाइन मार्क देण्यास नकार
माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च २०२५ सदर परीक्षेचे सर्व विषयाचे अंतर्गत मूल्यमापन, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा यांचे गुणदान
व उत्तर पत्रिका विद्यालयातील अनाधिकृत शिक्षक हे संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत, निलंबित मुख्याध्यापिका श्रीमती. सुतार सुरेखा महादेव, प्राथमिक मुख्याध्यापिका नवगिरे उल्का शशिकांत हे सर्वजण विद्यार्थ्यांचे गुणदान व उत्तरपत्रिका गुणदान याद्या ऑनलाइन पद्धतीने भरावयाच्या असून ते देण्यास नकार
शेवटचा दिवस असल्याने ते जाणीवपूर्वक मार्क देत नाहीत.
Nagpur News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबत रिल्समध्ये गजा मारणेसोबत असल्याने सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखलनागपूर -
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबत रिल्समध्ये गजा मारणेसोबत असल्याने सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल...
नागपूरचा कुख्यात गुन्हेगार असलेल्या राजा गौस ह्याने पुण्यातील गुख्यात गुन्हेगार गजा मारणे याच्यासोबत एक इंस्टाग्रामवर रिल्स शेयर केली... यात तीन जणांवर गुन्हे दाखल केली...
या रिल्स मध्ये "मै हु नागपूर का किंग"... अशा पद्धतीचा उल्लेख करत एक प्रकारे पोलिसाना आव्हान केले होते..
त्याच्यासोबत आणखी दोन ते तीन गुन्हेगार होते...त्यांनीही रिल्स अपलोड केली होती...
गजा मारणे हा नागपूरवरून पुढे जाणार होता... तो नागपुरातील या गुन्हेगारांसोबत थांबून जेवणही केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.. त्यानंतर राजा गौस यांने गजा मारणे सोबतची ही रिल्स पोस्ट केली...
Pune Crime: पुणे पोलिसांची पुणे सत्र न्यायालयाशी चर्चापुणे -
पुणे पोलिसांची पुणे सत्र न्यायालयाशी चर्चा
स्वारगेट एस टी स्टँड बलात्कार प्रकरणी आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात येण्याच्या संदर्भात ही चर्चा
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कुठला ही गोंधळ उडू नये, यासाठी आरोपीला व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे न्यायालयाच्या समोर नेण्याच्या बाबत प्राथमिक चर्चा
आरोपी दत्ता गाडे याच्यावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी आहे
पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे लक्ष
Nandurbar News: शहादा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, २ लाखांचे मोबाईल लंपासनंदूरबारच्या शहादा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ
मोबाईल दुकानातून लंपास केले दोन लाखांचे मोबाईल
चोरी करताना ची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Wardha News: वर्ध्यामध्ये खवल्या मांजरची तस्करी करणाऱ्यांना अटक- वर्ध्यामध्ये खवल्या मांजरची तस्करी करणाऱ्यांना अटक
- खवल्या मांजर खरेदी-विक्रीची दोन कोटीत होणार होती डील
- सहा तस्करांना ठोकल्या पुलगावातून बेड्या
- वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल
Kolhapur News: कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला भीषण आगकोल्हापूर -
कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला आग
शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
कोणतीही जीवित हानी नाही
Pune News: दत्ता गाडेला कोर्टात समक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याची शक्यतापुणे -
आरोपी दत्ता गाडेला कोर्टात समक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याची शक्यता
सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांकडून निर्णय घेतला जाऊ शकतो
दत्तात्रय गाडे विसीद्वारे कोर्टासमोर हजर राहण्याची शक्यता
शिवाजीनगर पोलिसांनी कोर्टात दिली माहिती
Beed News: सरपंच देशमुख हत्या प्रकरण, ८ मार्चला काँग्रेसची ५१ किलोमीटर सद्भावना पदयात्रासरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ मार्च रोजी बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे.
51 किलोमीटरची ही पदयात्रा असणार असून मसाजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात होईल.
बीड शहरात पोहोचल्यानंतर महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून सद्भावना सभेने यात्रेचा समारोप केला जाईल.
या सदभावना यात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ असणार आहेत.
Nandurbar News: नंदुरबारमध्ये बोदवड गावानजीक दुचाकीला भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यूनंदुरबार -
नवापूर तालुक्यातील बोदवड गावानजीक मोटरसायकलींचा अपघात
मोटर सायकलने घेतला मित्राचा जीव
दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक
अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
विसरवाडी पोलीस ठाण्यात प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल
Tulajapur News: तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पाचव्या आरोपीला अटकधाराशिव-
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक
मुंबईतील आरोपी संतोष खोतला पोलिसांकडून तुळजापुरात केले अटक
संगीता गोळे या मुंबईतील महिलेच्या अटक कारवाईनंतर ड्रग्ज प्रकरणात संतोष खोत हा मुंबईतील दुसरा आरोपी अटक
तामलवाडी टोल नाक्यावर ड्रग्जसह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर ड्रग्ज रॅकेटचा उलगडा
तुळजापुरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात चौकशी केल्याची माहिती
Raigad News: अलिबागजवळ समुद्रात मच्छीमार बोटीला आगरायगड-
० अलिबागजवळ समुद्रात मच्छीमार बोटीला आग
भर समुद्रात बोटीने घेतला पेट, आज सकाळची घटना
० आगीत बोट 80 टक्के जळून खाक
० बोटीवरील जाळी देखील जळाली
० बोटीवर 18 ते 20 खलाशी असल्याची माहिती
बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप
० साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची बोट
० आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती
० स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली आग विझविण्याचे काम सुरू
Vijay Wadettiwar: शक्ती विधेयक मंजूर न होणे हे महायुती सरकारचे अपयश - विजय वडेट्टीवारशक्ती विधेयक मंजूर न होणे हे महायुती सरकारचे अपयश, हे विधेयक अधिवेशनात पुन्हा आणावे
विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट देण्याचा आदेश धनंजय मुंडे यांनी दिला असेल
विधी मंडळ नेते वडेट्टीवार यांचा आरोप
Dhule News: मुंबई -आग्रा महामार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली, भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वायाधुळे -
मुंबई -आग्रा महामार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटल्याने भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी सर्रासपणे वाया
तापी जलवाहिनी फुटल्याने उंचच उंच पाण्याचे उरले कारंजे
लाखो लिटर पाणी पाईप लाईन फुटल्याने वाया गेल्याने नागरिकांचा संताप
परिसरात व रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया..
Nashik News: खासदार संजय राऊत आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावरनाशिक -
- खासदार संजय राऊत आज आणि उद्या नाशिक दौऱ्यावर
- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी पक्षांतर करणार असल्याच्या जोरदार चर्चा
- पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत यांचा नाशिक दौरा
- नाशिकमधील डॅमेज कंट्रोलच्या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या दौऱ्याला महत्व
- मागच्या महिनाभरात ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदेंच्या सेनेत दाखल
- या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती
Nagpur News: नागपुरमधील जैन मंदिरात मूर्तीची आणि इतर मौल्यवान साहित्याची चोरी- नागपुरच्या 'नागदा दिगंबर जैन समाज मंदिरा'त मूर्तीची आणि इतर मौल्यवान साहित्याची चोरी
- कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील श्री शीतल नाथ दिगंबर जैन मंदिरात झाली चोरी
- मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चोरीची घटना घडली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालीय
- कोतवाली पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोराचा शोध सुरू
- चांदीच्या पाच मूर्ती,छत्र,पंचमेरू सिंहासन,आणि दानपेटीतील 2 लाख रुपयांची रक्कम चोरीला
- चोरी गेलेल्या चांदींच्या मूर्तींचे एकत्रित वजन सुमारे 5 किलो,10 किलो वजनाचे सिंहासन
Navi Mumbai: नवी मुंबईत आज वनमंत्री गणेश नाईक यांचा दुसरा जनता दरबारनवी मुंबई -
नवी मुंबईत आज वन मंत्री गणेश नाईक यांचा दुसरा जनता दरबार.
कालच खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत जनता दरबार घेताच आज नाईकांचा जनता दरबार.
जनता दरबारात टोकन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी.
लोकांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम जनता दरबार च्या माध्यमातून करण्यात येतेय.
Pune News: लष्कर पोलिस ठाण्यात पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा दाखलपुणे -
लष्कर पोलिस ठाण्यात पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा दाखल
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील सुद्धा पोचल्या
लष्कर पोलिस ठाण्याच्या कोठडीत सध्या आरोपी दत्ता गाडे याला ठेवण्यात आले आहे
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या घटनेच्या बाबत आढावा घेतला जाणार
आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल
Mumbai News: चिंचपोकळीमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आगचिंचपोकळीमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आगीचे कारण अस्पष्ट
Nashik: चांदवड शहरातील आठवडे बाजारातील अतिक्रमण काढण्यास सुरवातनाशिकच्या चांदवड शहरातील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने ते काढण्यात यावे अशी मागणी होत होती..
अखेर चांदवड नगर परिषदेच्या मुख्यधिकारी यांनी या मागणीची दखल घेत आज सकाळ पासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे..
या मुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..
अतिक्रमण काढण्यास सुरवात झाल्याने शहरातील मुख्य रस्ते मोकळा श्वास घेणार आहे..
Hingoli: हिंगोलीच्या सिध्देश्वर गावकऱ्यांचा धोकादायक पुलावरून प्रवासहिंगोली च औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर गावच्या हजारो ग्रामस्थांना दररोज धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
सिध्देश्वर धरण परिसरातील कालव्यावर निर्मिती झालेला हा पूल पूर्णपणे खचला आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह पूर्ण पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Ratnagiri News: बदलत्या हवामानाचा फळांचा राजा हापूस आंब्याला फटकारत्नागिरी- बदलत्या हवामानाचा फळांचा राजा हापूस आंब्याला फटका
वाढत्या तापमानामुळे आंबा भाजला जातोय
उष्णतेमुळे आंबा फळाची गळ, तर तापमान बदलामुळे आंब्यावर किडीचा मोठा प्रादुर्भाव
नैसर्गिक संकटामुळे या वेळेला आंब्याचे फक्त 25%च उत्पादन
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या 38 अंशावरती तापमान
ढगाळ हवामान आणि वाढत्या तापमानामुळे आंब्यावरती मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव
अंबा बागायतदारांना पुन्हा करावी लागतेय फवारणी
नैसर्गिक संकटात पीक वाचवण्यासाठी आंबा बागायतदारांची धडपड
Pune News: पुणे महापालिकेच्या २०२५-२६ या वर्षाच्या अंदाजपत्रकाला अखेर मुहूर्तपुणे -
पुणे महापालिकेच्या २०२५-२६ या वर्षाच्या अंदाजपत्रकाला अखेर मुहूर्त
४ मार्च रोजी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर करणार
याच दिवशी महापालिकेची मुख्य सभा घेऊन त्याला मंजुरीदेखील मिळण्याची शक्यता
पुणेकरांच्या हितासाठी कोणत्या योजनांना प्राधान्य देणार, कोणत्या योजनांसाठी किती निधी उपलब्ध करून देणार याकडे पुणेकरांचे लक्ष
येत्या ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अंदाजपत्रक मांडले जाणार
Pune News: दत्ता गाडेविरोधात यापूर्वी पुणे आणि आहील्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हेपुणे -
- स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरण
- आरोपी दत्ता गाडेविरोधात यापूर्वी पुणे आणि आहील्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे
- शिक्रापूर पोलीस स्टेशनला दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
- शिरूर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आरोपी विरोधात एक चोरीचा गुन्हा
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात दोन चोरीचे गुन्हे
- पुण्यातील स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये मागील वर्षी एक मोबाईल चोरीचा गुन्हा
Nashik News: केंद्राच्या निर्यातीबाबतच्या धरसोड धोरणाचा फटका कांद्यालानाशिक -
- केंद्राच्या निर्यातीबाबतच्या धरसोड धोरणाचा फटका कांद्याला
- मागील वर्षीपेक्षा कांदा निर्यातीत तब्बल २० टक्क्यांनी घट
- मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान २५.२५ लाख टन कांदा निर्यात, तर यंदा १७.१७ लाख टन कांदा निर्यात
- मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांदा निर्यातीत ६९६ कोटी रुपयांची घट
- कांद्यावरील निर्यात शुल्क, निर्यात मूल्य आणि अन्य निर्बंधाचा कांद्याला फटका
- कांदा निर्यातीवरील निर्बंध पूर्णपणे हटवण्याची शेतकऱ्यांची आहे मागणी
Pune News: दुपारी २ वाजता आरोपी दत्ता गाडेला न्यायालयात हजर करण्याची शक्यतापुणे -
दुपारी २ वाजता आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता
पुणे पोलिसांनी अटक केलेला आरोपी दत्ता गाडे याला दुपारी २ वाजता पुणे सत्र न्यायालयात हजर करण्याची शक्यता
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे
रात्री १.१५ वाजता गाडे याला पुणे पोलिसाने केली शिरूर मधून अटक
Nanded News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
- साडेनऊ वाजता अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर होणार आगमन
- अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश सोहळा
- काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह जिल्ह्यातील इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर संस्थान कडूनच कर्मचाऱ्यांची तुघलकी पद्धतीने लूट..?तुळजाभवानी मंदिर संस्थान कडूनच कर्मचाऱ्यांची तुघलकी पद्धतीने लूट..?
मंदिर संस्थानने कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये घेतल्याची सुञांची माहिती
मंदिर संस्थानकडून 62 नवीन वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती
39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थानने 78 लाख रुपये केले सक्तीने वसूल
तर इतर कर्मचाऱ्यांकडून महिन्याच्या पगारातून सक्तीने बँक गॅरंटीचे पैसे केले जात आहेत कपात, सक्तीच्या वसुलीमुळे कर्मचारी मेटाकुटीला
कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठीच्या कागदपत्र पडताळणी वेळी बेकायदेशीर बँक गॅरंटी मंदिर संस्थानने तोंडी आदेशाने लादली
मंदिर संस्थानच्या या जाचक अटीमुळे काही जणांना सोडावं लागलं नोकरीवर पाणी
नोकरीची जाहिरात,नियुक्तीपत्र कुठेही बँक गॅरंटीचा उल्लेख नाही,मग कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटीची वसुली का ?
Ratnagiri News: रत्नागिरी- दापोली नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीला धक्कारत्नागिरी- दापोली नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीला धक्का
राष्ट्रवादीतून शिंदे गटात गेलेले आणि उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा वेगळा गट
अशा वेगळ्या गट स्थापन करून १४ नगरसेवकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला आणले अल्प मतात
१४ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावून केला वेगळा गट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मान्यता
नगराध्यक्षांवर लवकरच अविश्वास ठराव आणला जाणार
दापोली नगरपंचायतीमध्ये राजकीय उलथापालथ
Shirdi News: साई संस्थानला परकीय चलन स्वीकारण्याची परवानगीसाई संस्थानला परकीय चलन स्वीकारण्याची परवानगी
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली परकीय चलनाचे दान स्वीकारण्याची परवानगी
केंद्राने 2021 मध्ये गोठवला होता साई संस्थानसह देशातील अनेक प्रमुख देवस्थानांचा परकीय चलन परवाना
निर्बंध उठल्याने साई संस्थानला मोठा दिलासा
मागील तीन वर्षात साई संस्थानकडे परकीय चलनाद्वारे जमा झालेले 20 कोटी रुपये व्यवहारात येणार
Beed News: बीडच्या कारागृहात वाल्मीक कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोपबीडच्या कारागृहात वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप
देशमुख कुटुंबाकडून कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार
जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप
Pune News: सोमवारी पुण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठकसोमवारी पुण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर होणार मंथन
रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष..मोठ्या आंदोलनाची शक्यता
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाण्यात झालेल्या वादळी बैठकीनंतर आता पुण्यात राज्यव्यापी बैठक
Amravati News: अमरावती जिल्ह्यात एसटी प्रवाशांकडून ऑनलाईन पेमेंटला पसंती- अमरावती जिल्ह्यात एसटी प्रवाशांकडून ऑनलाईन पेमेंटला मोठ्या प्रमाणावर पसंती
- एसटीला यूपीआय मुळे फायदा आठ आगारांमध्ये सुविधा;क्यू आर कोडचा होतोय फायदा
- एसटीमध्ये ऑनलाइन पेमेंट आल्याने सुट्या पैशाची कटकट प्रवासी आणि वाहकांची कमी झाली
- तरुण प्रवासी देत आहेत ऑनलाईन पेमेंटला पसंती
Amravati News: अमरावती ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर 340 गुन्हेगार वॉन्टेड- अमरावती ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवर 340 गुन्हेगार वॉन्टेड...
- मागील वर्षी पकडले 90 गुन्हेगार पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची माहिती..
- विविध गुन्हे करून परागंदा होणाऱ्या गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढली..
- अमरावती जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशन पैकी 29 पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर 103 आरोपी फरार आहे.