WPL 2025, MI vs DC : मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर 124 धावांचं सोपं आव्हान, गोलंदाजांची लागणार कसोटी
GH News March 01, 2025 12:10 AM

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचं पारडं जड दिसत आहे. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सला कमी धावांवर रोखून विजय मिळवणं सोपं होईल, असं दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने आधीच सांगितलं होतं. दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला कमी धावांवर रोखलं. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 123 धावा केल्या आणि विजयासाठी 124 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून मिनू मनी आणि जेस जोनसेनने सर्वाधिक विकेट घेतल्या. 4 षटाकात 25 धावा देत तीन गडी बाद केले. तर मिनू मनीने 3 षटकात 17 धावा देत 3 गडी बाद केले. तर शिखा पांडे आणि अनाबेल सुदरलँडने प्रत्येकी 1 गडी बाद केला.  आता मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. त्यांना दिल्ली कॅपिटल्सला दिलेलं सोपं आव्हान रोखण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागतील.

मुंबईने सावध सुरुवात केली पण त्यानंतर धडाधड विकेट पडल्या. 35 धावांवर मुंबई इंडियन्सची बिन बाद अशी स्थिती होती. यास्तिका भाटियाच्या रुपाने पहिला धक्का बसला. ती फक्त 11 धावा करून बाद झाली. त्यानंतर विकेट्सची रांग लागली. हेली मॅथ्यूज 22, हरमनप्रीत कौर 22, नॅट स्कायव्हर ब्रंट 18, संजीवन संजना 5 धावा करून बाद झाले. जी कमालिनी 1, संस्कृी गुप्ता 3 अशा एकेरी धावांवर तंबूत परतले.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अ‍ॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, मिन्नू मणी, तितास साधू.

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, जिंतीमणी कलिता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.