सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त छावा या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाने फार कमी कालावधीत कोट्यवधींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने ५०० कोटींच्या कमाईचा आकडा देखील पार केला आहे. या चित्रपटासाठी अनेकांनी मेहनत घेतली. पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांना साकारण्यासाठी पडद्यामागे अनेक लोकांची मेहनत आहे. यामधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर. लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटासाठी खूप मेहनत केली. (Success Story Of Laxman Utekar)
लक्ष्मण उतेकर यांचा जन्मत झाला. त्यांचा इंडस्ट्रीशी काहीच संबंध नव्हता. त्यांना सिनेमाचे नेहमीच आकर्षण होते. त्यामुळे ते मुंबईला आले.सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला.त्यानंतर त्यांनी अनेक फिल्म स्टुडिओमध्ये वेगवेगळी नोकरी करायचे. त्यांनी साफसफाईचेदेखील काम केले होते. याच काळात ते स्टुडिओत बसून सिनेमॅटोग्राफी बघायचे. त्यातूनच त्यांनी अनेक गोष्टी शिकायचे. (Success Story Of Chhaava Director Laxman Utekar)
लक्ष्मण उतेकर यांना लुका छुपी, मिमी या चित्रपटामुळे ओळख मिळाला. परंतु छावा या चित्रपटाने त्यांना वेगळीच उंची मिळवून दिली. त्यांच्या या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
लक्ष्मण उतेकर यांनी पहिल्या काळात खूप अडचणींचा सामना केला. त्यांनी सुरुवातीच्या काळात अक्षरशः वडापावदेखील विकले आहेत. स्वतः चा दिवसाचा भागवण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली.परंतु ते या सर्व प्रवासात अनेक गोष्टी शिकले.
फिल्म स्टुडिओमध्ये वेगवेगळी कामे करताना त्यांनी मोठ्या लोकांना आपल्यासमोर काम करताना बघितले. त्यांच्यासोबत राहून शिकले. या सगळ्याचा त्यांना भविष्यात खूप फायदा झाला. त्यांनी आज ५०० कोटींचा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाने त्यांना वेगळीच ओळख मिळवून दिली आहे.