Maharashtra Politics News live : विशाळगडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करा; वन मंत्री नाईक यांचे आदेश
Sarkarnama March 02, 2025 01:45 AM
Ajit Pawar On Eknath Shinde : भगवा फडकवण्याच्या शिंदेंच्या विधानावर, अजितदादा भडकले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात भगवा फडकवणार अशी घोषणा केली होती. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pune News : '...म्हणून स्वतःच्या घराच्या काचा फोडणार का?', दादांचा तात्यांना सवाल

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. दरम्याम याच घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा रक्षक केबिनची तोडफोड केली होती. त्यावरून आता उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरे यांना चांगलंच सुनावलं आहे.

Vishalgad Fort News : विशाळगडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करा; वन मंत्री नाईक यांचे आदेश

विशाळगडावरील अतिक्रमणे वन खात्याने तातडीने जमीनदोस्त करावीत असे आदेशच वन मंत्री नाईक यांनी दिले आहेत. तसेच वन मंत्री नाईक यांनी, विशाळगडावरील वन खात्याच्या जमिनीवर असणारी अतिक्रमणे काढून, ती निघालीच पाहिजेत, गडाचे पावित्र्य जतन झाले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणे विरोधात नितीन शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.

Eknath Shinde Shivsena News : साताऱ्यातील आझादपूर गावाचा शिंदे गटात प्रवेश

कोरेगाव तालुक्यातील आझादपूर गावातील सरपंच उपसरपंचसह संपूर्ण ग्रामस्थांनी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच अख्खे गावच भगवेमय झाले असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली आहे.

Manikrao Kokate Live : कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी आणखी एक अर्ज

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज देणार अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. शासनाच्या सदनिका लटल्या प्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी अर्ज केला आहे. मात्र याआधीच त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनात विरोधी पक्षनेते करा, ठाकरेंच्या आमदारांचं मत

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. आदित्य यांनाच विरोधी पक्षनेते करावे असं ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदारांचे मत आहे. मातोश्रीवर आमदारांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चे दरम्यान काही आमदारांनी आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या रुपाने एक तरुण विरोधी पक्ष नेता राज्याला मिळू शकतो आणि त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असं ठाकरेंच्या काही नेत्यांचं मत आहे.

Mumbai Local Mega Block : आज रात्री मुंबई लोकलच्या दोन्ही प्रमुख लाइनवर मेगाब्लॉक

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान गर्डर कामासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 10 ते सकाळी 11 वाजेपर्यंत असा तब्बल 13 तासांचा हा मोठा ब्लॉक असणार आहे.

Manikrao Kokate Live : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य आज ठरणार

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आज देणार अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं. अपिलावर सुनावणी पार पडल्यानंतर आज न्यायालय निकाल देणार आहे. कोकाटेंना झालेल्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.