WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचं टॉप 3 मधलं गणित सुटलं, पराभवामुळे आरसीबीचं गणित जर तर वर
GH News March 02, 2025 02:06 AM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 14 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठी धावसंख्या उभारण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आरसीबीला हे गणित काही जमलं नाही. आरसीबीने 20 षटकात 5 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 9 गडी राखून 15.3 षटकात पूर्ण केलं. यासह दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीवर 9 विकेट आणि 27 चेंडू राखून पराभव केला. आरसीबीकडून एलिसा पेरीने चांगळी कळेी केली. पण तिला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. एलिसा पेरीने 47 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने नाबाद 60 धावा केल्या. पण प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सच्या शफाली वर्मा बॅट जबरदस्त चालली. शफाली वर्माने 43 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. तर जेस जोनासेनने 38 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 61 धावांची खेळी केली.

दिल्ली कॅपिटल्सने या विजयासह अव्वल स्थान कायम ठेवलं. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने 7 सामने खेळले असून 5 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे 10 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. इतर संघांचे गुण पाहता दिल्ली टॉप 3 मध्ये कायम राहिल हे स्पष्ट आहे. आता अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणं भाग आहे. दुसरीकडे, आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान आता डळमळीत झालं आहे. आरसीबीने सहा पैकी 4 सामने गमावले आहेत आणि 4 गुण आहेत. आरसीबीने स्पर्धेतील दोन सामने जिंकले तरी 8 गुण होतील. त्यामुळे आता गणित जर तर वर आलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, मिन्नू मणी, नल्लापुरेड्डी चरणी.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनिएल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, कनिका आहुजा, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, एकता बिष्ट.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.